नाना पटोले म्हणाले, फुटपाथ दुकानदारांना 10 हजारांची मदत द्या 

फुटपाथ दुकानदारांना आपल्या मालाची विक्री करणे सोयीचे व्हावे, याकरिता स्ट्रीट वेंडर कायदा लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, प्रत्येकाला विक्री करण्याचे प्रमाणपत्र द्यावे, जोपर्यंत प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत दुकानदारांवर कारवाई करण्यात येऊ नये.
nana
nana

नागपूर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात स्ट्रीट वेंडर्सनी आपला व्यवसाय पूर्णपणे गमावला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही त्यांच्या व्यवसायाची घडी निट बसलेली नाही. त्यामुळे या वेंडर्सना आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारतीय असंघटित कामगार कॉंग्रेस कमिटीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली. पटोलेंनी निवेदनाची तत्काळ दखल घेत वेंडर्सना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. 

इंटकचे राष्ट्रीय समन्वय त्रिशरण सहारे, डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. शरद वानखेडे, राजेश पिल्ले, मंगेश चंद्रनारायण, शशिकांत जांभूळकर, प्रभाकर सोमकुवर, अश्‍वीन शंभरकर आदींनी पटोले यांना याबबतचे निवेदन दिले. लॉकडाऊनमुळे फुटपाथ दुकानदारांचा सुमारे तीन महिने व्यवसाय पूर्णपणे बंद होता. अद्यापही तो सुरळीत झालेला नाही. रोजगार नसल्याने अनेकांवर भिक मागण्याची वेळ आली आहे. अनेकांकडे घरभाडे देण्यास पैसेसुद्धा नाहीत. अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला 10 हजार रुपयांची मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी इंटकच्यावतीने करण्यात आली. फुटपाथ दुकानदारांना आपल्या मालाची विक्री करणे सोयीचे व्हावे, याकरिता स्ट्रीट वेंडर कायदा लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, प्रत्येकाला विक्री करण्याचे प्रमाणपत्र द्यावे, जोपर्यंत प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत दुकानदारांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशीही मागणी यावेळी त्रीशहण सहारे यांनी केली. 

अखिल भारतीय असंघटित कामगार कॉंग्रेस कमिटीने पुढाकार घेतल्यामुळे फुटपाथ दुकानदारांना दिलासा मिळणार आहे. 10 हजार रुपयांची मदत मिळणार असल्यामुळे किमान पोटापाण्याची व्यवस्था होऊन व्यवसायाला नवीन उभारी देण्यासाठी ते प्रयत्न करू शकणार आहेत. या मिळणाऱ्या रकमेचे योग्य नियोजन करुन फुटपाथ दुकानदारांनी व्यवसाय रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा असंघटित कामगार कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com