नाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला? - nana patole is not heedless mp lashes out at those who are angree with mp mendhe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

नाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला?

अभिजित घोरमारे
रविवार, 25 जुलै 2021

खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन भाजपमधील मोठी फळी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदारांवर शहरातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत.

भंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना भाजपने गळाला लावले. त्यानंतर पक्ष संघटन बळकट करण्यासाठी राज्य पिंजून काढणाऱ्या नानांचे त्यांच्याच जिल्ह्यावर नियंत्रण नसल्याचे ताशेरे ओढले गेले. पण नाना पटोले गाफील नाहीत, तर इलमे गेल्यानंतर त्यांनी भाजपला खिंडार पाडण्याची तयारी तेव्हाच करून ठेवली होती. भाजपचे खासदार सुनील मेंढे MP Sunil Mendhe यांचे खास मोहरे कॉंग्रेसच्या गळाला लागले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व खासदार मेंढे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. All these MPs are said to be unhappy with the working of the Mendhe. 

आपला गृहजिल्हा भंडारा येथे भाजपला आव्हान देण्यासाठी नाना पटोले आणि त्यांच्या टिमने चांगली तयारी केली आहे. इलमे यांना भाजपने अडकवल्यानंतरही आपल्याला काहीही फरक पडला नसल्याचा संदेश देण्याची तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. तुम्ही १ नेला तर आम्ही तुमचे १० आणू, असेच काहीसे राजकारण भंडारा जिल्ह्यात सध्या सुरू आहे. इलमे यांना भाजपने नेल्यानंतर त्याचा वचपा कॉंग्रेस लवकरच काढणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्या घरी काल रात्री ९ ते १०.३० वाजताच्या दरम्यान भाजपच्या भंडाऱ्यातील काही महत्वाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. त्यानंतर आता भाजपला कोणत्याही वेळी खिंडार पडण्याची शक्यता आहे. 

आमदार वंजारी यांच्या घरी झालेल्या बैठकीत कॉंग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हेसुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे. यावेळी भाजपचे भंडारा जिल्हा सचिव, भंडारा प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष, ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष व नगरसेवक, भाजपचे नगर उपाध्यक्ष, शहर कार्यकारी सदस्य, व्यापारी आघाडीचे माजी अध्यक्ष यांशिवाय बरेचसे आजी-माजी नगरसेवकांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सचिवही या बैठकीला उपस्थित होते. काल रात्री दीड तास चाललेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती खूप काही सांगून जाते. 

हेही वाचा : पंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..

खासदार सुनील मेंढे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन भाजपमधील मोठी फळी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदारांवर शहरातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री आमदार वंजारी यांच्या घरी भाजपचे १८ लोक उपस्थित राहणार होते. पण वेळेपर्यंत ७ ते ८ लोकच आले. पण हे १८ ही पदाधिकारी खासदार मेंढे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीला जरी ते आलेले नसले तरी ते भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख