नाना, जरा दमानं...!  वंचित बहुजन आघाडीने दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सल्ला...

यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी सोडून चर्चा करा, अशी भूमिका घेतली होती. आता त्याच भूमिकेवर कायम आहातका, या प्रश्नाला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी बगल दिली
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

अकोला : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State President of Congress MR. Nana patole सध्या पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अकोला येथे असताना त्यांनी विविध विषयांवर राजकीय चर्चा घडवून आणली. कॉंग्रेस स्वबळावर लढेल, असे सांगतानाच राज्यात समविचारी पक्षांना सोबत Initiated political disucssions on several issues घेत ॲड. प्रकाश आंबेडकर Ad. Prakash Ambedkar यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचेही नानांनी सांगितले होते. यावर आघाडीच्या चर्चेबाबतचा पूर्व इतिहास तपासूनच नानांनी वक्तव्ये करावी. त्यामुळे नाना, जरा दमानं...!, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर Dr. Dharywardha Pundkar यांनी दिला आहे.

अकोला जिल्हा दौऱ्यावर असताना नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देण्यासोबतच समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सुतोवाच केले होते. ही चर्चा केवळ वृत्तपत्रातूनच आहे का, की चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला दिल्लीतून मिळाला आहे, अशी विचारणा करीत वंचितचे डॉ. पुंडकर यांनी नानांच्या या वक्तव्याचा अर्थ आम्ही राज्यात मध्यावधी निवडणुकीची हालचाल सुरू झाली आहे, असा घ्यावा का, असा प्रश्नही उपस्थित केला. शासकीय विश्रामगृहात आज सकाळी ११.३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पुंडकर यांनी काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचा इतिहास उलगडून दाखविला. 

यापूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना दिल्लीत जाऊन भारिप-बहुजन महासंघासोबतच आघाडीचा प्रस्ताव दिला होता. त्याला अपेक्षित दाद मिळाली नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही असाच प्रयत्न झाला. त्यावेळी विलासराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देऊन भारिप-बमसंला सोबत घेण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला असल्याचा दावाही डॉ. पुंडकर यांनी केला. ते म्हणाले की, आम्ही त्यावेळी अशी कोणतीही मागणी केली नव्हती. तो प्रस्ताव काँग्रेसनेच दिल्लीतील सर्वोच्च नेतृत्वाला दिला होता. त्याला नकारात्मक प्रतिसाद मिळाला. 

आता पुन्हा नाना पटोले वर्तमानपत्रांतून युती संदर्भात बोलणी करू पाहत आहेत. एकीकडे स्वबळाची भाषा तर दुसरीकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीची चर्चा, यावरून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, ते स्पष्ट होत नसल्याचे डॉ.पुंडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेला वंचितच्या प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाट, युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे, शोभा शेळके, डॉ. प्रसन्नजीत गवई आदींची उपस्थिती होती. 

नाना या प्रश्नांची उत्तर देतील का? 
युतीबाबतच्या चर्चेत यापूर्वी जे झाले ते बघता नानांच्या बाबतही येरे माझ्या मागल्या, असे घडू नये. म्हणून नाना पटोले यांनी या प्रश्नाची उत्तरे द्यावी, असे आवाहन डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना केले. 
- नानांचे वक्त्यव्य म्हणजे, राज्यात मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, असे मानावे का?
- युतीबाबत नानांची ही वैयक्तिक भूमिका आहे, की दिल्लीतून त्यांना तशी परवानगी मिळाली?
- यापूर्वी चर्चेबाबत दिल्लीतून मिळालेला नकारात्मक प्रतिसाद बघता नानांची वाटचाल त्याच दिशेने तर होत नाही ना?
- वंचितने दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वावर कधीच अविश्वास दाखविला नाही. परंतु मागील इतिहास बघता युती संदर्भात समझोता करण्यापूर्वी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतून परवानगी घेतली का?
- ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीची चर्चा करण्यासाठी कुणाची नियुक्ती केली आहे?
- दिल्लीतूनच परवानगी घ्यायची असेल तर दिल्लीत कुणासोबत चर्चा करायची ते सांगा?

राष्ट्रवादीबाबत बाळासाहेब घेतील भूमिका
एकीकडे काँग्रेसकडून युतीच्या चर्चेबाबत वर्तमानपत्रांतून सांगितले जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी सोडून चर्चा करा, अशी भूमिका घेतली होती. आता त्याच भूमिकेवर कायम आहात का, या प्रश्नाला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी बगल दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबतची भूमिका बाळासाहेबच जाहीर करतील, असे सांगितले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com