नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून दूनेश्वर पेठेंचे नाव निश्चित? - the name of duneshwar pethe as the city president of ncp is certain | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून दूनेश्वर पेठेंचे नाव निश्चित?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 जून 2021

राज्यात सध्या मोठा भाऊ म्हणून वावरत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू होती. त्यासाठी चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि दुनेश्‍वर पेठे कालच मुंबईला गेले.

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीमध्ये Mahavikas Aghadi सध्या मोठा भाऊ म्हणून वावरत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू होती. त्यासाठी चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, Pravin Kunte Patil जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार Prashant Pawar आणि दुनेश्‍वर पेठे Duneshwar Pethe कालच मुंबईला गेले. आज या तिन्ही नावांवर चर्चा होऊन शेवटी नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांची निवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. In the end, corporator Duneshwar Peth was selected, sources said

आज दुपारपर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही सांगण्यात आले आहे. नागपूर मेट्रोला कैचीत पकडण्याची एकही संधी न सोडणारे प्रशांत पवार हेसुद्धा अध्यक्षपदासाठी दावेदार होते. पण त्यांची निवड न होण्यामागे त्यांना झालेला पक्षांतर्गत विरोध कारणीभूत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस १० जूनला आहे. त्यापूर्वीच नागपूर शहराचा अध्यक्ष निवडला जाईल, अशा हालचाली गेल्या ४ - ५ दिवसांपासून सुरू होत्या. त्यासाठी शहरातील काही पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले होते. त्यामुळे संबंधित सर्वच कालपासून मुंबईला गेले होते. अपेक्षेप्रमाणे आज दुपारपर्यंत दुनेश्‍वर पेठे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.  

अनिल अहीरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांना बढती देऊन प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष करण्यात आले आहे. शहराच्या अध्यक्षाची निवडीसाठी नगरसेवक दुनेश्वर पेठे आणि जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची नावे आघाडीवर होती. मात्र या दोन्ही नावांना नंतर अंतर्गत विरोध सुरू झाला होता. याच कारणाने तातडीने अध्यक्ष जाहीर करण्याचे राष्ट्रवादीने टाळले होते. त्यानंतर माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांचे नाव समोर आले होते. तेसुद्धा काल मुंबईला तातडीने रवाना झाले होते. 

हेही वाचा : पोलिस दलातील संघर्षयोध्याची कोरोनाशी झुंज अपयशी  

शहराध्यक्षाची निवड करून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे शहरात बोलले जात आहे. नवीन शहराध्यक्षावर महापालिका निवडणुकीची मोठी जबाबदारी असणार आहे. सध्या दुनेश्‍वर पेठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव नगरसेवक महापालिकेत आहेत. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आपले सहकारी सदस्य वाढवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.  
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख