उपराजधानीला मांजाचा फास, थोडक्यात बचावले ३३ जण..

पोलिस, महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे शहरात कामानिमित्त, नोकरीनिमित्त फिरणाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. विविध सामाजिक संघटनांनी संक्रांतीच्या अगोदरच नायलॉन मांज्यावर बंदीबाबत अनेक निवेदन दिली. परंतु ढिम्म प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
Nilesh Dakhore
Nilesh Dakhore

नागपूर : दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा नायलॉन मांज्याने जीव गेल्यानंतरही ढिम्म प्रशासनाकडून गुरुवारी दिवसभर केवळ कारवाईचा फार्स करण्यात आल्याचे आज पतंगोत्सवानिमित्त उघडकीस आले. आज दिवसभरात ‘सकाळ’ चे पत्रकार निलेश डाखोरे यांच्यासह ३३ जण नायलॉन मांज्यामुळे जखमी झाले. डाखोरे यांचा बाजूने गळा चिरला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेने प्रशासन किती मुर्दाड आहे, हे दिसून आले असून नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात पतंग व मांजा विक्रीची दुकाने थाटण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सर्रास नायलॉन मांजा विक्री सुरू आहे. परंतु प्रशासनाकडून केवळ औपचारिकता म्हणून कारवाई करण्यात येत आहे. गेली अनेक दिवस झोप काढणाऱ्या प्रशासनाला एका तरुणाचा जीव गेल्यानंतर जाग आली. परंतु त्यातही कारवाईत हलगर्जीपणाच केल्याने आज संक्रांतीच्या दिवशी अनेकांचे नायलॉन मांज्याने गळे कापले गेले. जाटतरोडीत प्रणय ठाकरे या युवकाचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईस सुरवात केली. परंतु त्यापूर्वीच अनेक पतंगप्रेमींनी नायलॉन मांजा खरेदी करून ठेवला. लक्षावधीचा मांजा शहरात विकल्या गेला. मांजामुळे जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या. 

या घटनांची पोलिस दप्तरी नोंद झाली नसल्याने अनेक जखमींचा निश्‍चित आकडा मिळू शकला नाही. शहरात विविध ठिकाणी मांजामुळे ३२ पेक्षा अधिक जण जखमी झाले. मेयोमध्ये सात तर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये १५ जखमींवर उपचार करण्यात आले. अन्य जखमींनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज ‘सकाळ’ चे पत्रकार नीलेश डाखोरे साडेचारच्या सुमारास कार्यालयातून दुचाकीने घरी जात जात होते. वर्धा रोडवरील ‘डबल डेकर’ पुलावरून जात असताना नायलॉन मांजा त्यांच्या गळ्याला गुंडाळल्या गेला. मांजा काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा गळा चिरला. त्यामुळे डाखोरे यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतून ते थोडक्यात बचावले. अशाप्रकारे कुठलीही पोलिस तक्रार न करता खासगीत उपचार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात आज जखमी झालेल्यांची संख्याही मोठी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

 
चाकरमान्यांचा जीव धोक्यात 
पोलिस, महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे शहरात कामानिमित्त, नोकरीनिमित्त फिरणाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. विविध सामाजिक संघटनांनी संक्रांतीच्या अगोदरच नायलॉन मांज्यावर बंदीबाबत अनेक निवेदन दिली. परंतु ढिम्म प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने एका तरुणाला प्राण गमवावे लागले तर अनेकजण जखमी झाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com