बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतूक सुरू होणार ..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसूलापूर परिसरात समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
Uddhav Thackeray at amravati.
Uddhav Thackeray at amravati.

अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या समृद्धी महामार्गाचे म्हणजेच आजच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि १ मे २०२१ म्हणजेच महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डी दरम्यान वाहतूक सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सरकारकरीता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

समृध्दी महामार्गाच्या कामाची हवाई पाहणी करण्याकरीता ते आज अमरावती आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात नागपुर ते शिर्डी दरम्यान समृध्दी महामार्ग वाहतूकीकरीता खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चांगल्या दर्जाचं काम होत आहे. कोरोना काळातही समृद्धी महारार्गाचं काम सुरु होतं. येत्या १ मे पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होईल, असे त्यांनी जाहीर केले 

मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसूलापूर परिसरात समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे ७०० किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com