नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण - nagpur police commissioner amitesh kumar infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

यापूर्वी पोलिस दलातील पोलिस सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे तसेच माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते लवकर बरेसुद्धा झाले होते. सध्या पोलिस आयुक्त ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असून कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

नागपूर : शहर पोलिस दलाचे प्रमुख पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला गृहविलगिकरणात ठेवले आहे. तसेच कळत-नकळत संपर्कात आलेल्या पोलिस अधिकारी आणि नागरिकांना स्वतःची कोरोना चाचणी करून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना गेल्या तीन दिवसांपूर्वी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला नियमानुसार गृहविलगिकरणात ठेवले आहे. अमितेश कुमार यांनी नागपूर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘फील्ड’वर काम करण्याचा धडाका सुरू केला होता. 

पोलिस अधिकारी आणि नागरिकांच्या बैठका घेतल्या होत्या. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत. यापूर्वी पोलिस दलातील पोलिस सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे तसेच माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते लवकर बरेसुद्धा झाले होते. सध्या पोलिस आयुक्त ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असून कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख