नागपुरात नायलॉन मांजाने घेतला तिसरा जीव, राष्ट्रवादी कॉंग्रेस उतरली रस्त्यावर 

छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. पक्ष्यांचा, जनावरांचा आणि माणसांच्या जिवास धोका निर्माण होत आहे आणि म्हणून या बाबतीत कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
Shrikant Shivankar Naylon Manja
Shrikant Shivankar Naylon Manja

नागपूर : संक्रांत एका दिवसावर आली आहे. अशात रंगीबेरंगी पतंगांनी आकाश गजबजू लागले आहे. पण आज शहरात नायलॉन मांजाने प्रणय ठाकरे या युवकाचा जीव घेतला. हा जीवघेणा मांजा लोकांनी वापरू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते श्रीकांत शिवणकर यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती केली. येवढेच नव्हे तर नियम तोडून नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर आणि वापरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 

गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांना नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. नायलॉन मांजामुळे संक्रांतीच्या काळात पशुपक्ष्यांना हमखास इजा होते. हा मांजा रस्त्यात, झाडावर किंवा इतरत्र अडकल्याने नागरिकांच्या जिवालाही घातक ठरतो. त्यामुळे अनेक नागरिकांना, तसेच पक्ष्यांनाही गंभीर इजा झाल्या आहेत. या मांजामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. 
नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर नागरिक जखमी झाले होते. मात्र, तरीही यातून बोध घेतला जात नसून या मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. 

नागपुरात अनेक वर्षांपासून नायलॉन मांजाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यक्रम घेण्यात येतात. मागील संक्रांतीच्या काळात नायलॉनचा मांजा वापरू नये, यासाठी जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात या मांजाच्या वापराला आळा बसला. पक्षी व लोकांच्या जिवावर बेतण्यास कारण ठरलेला नायलॉन धागा पतंगांसाठी वापरण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी आणली असली तरी त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. पक्ष्यांचा, जनावरांचा आणि माणसांच्या जिवास धोका निर्माण होत आहे आणि म्हणून या बाबतीत कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवध भादंवी कलम ३०४, ३३६, ३३७, ३३८ या प्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात जनजागृती अभियानाची आज सक्करदरा चौकातून राबवण्यात आले. 

जनजागृती रॅलीत पतंग दुकानदारांना आणि रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजामुळे होणारे नुकसान आणि ते न विकण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. जनजागृती रॅलीचे आयोजन श्रीकांत शिवणकर आणि नगरसेवक अशोक काटले यांनी केले. यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, विद्यार्थी अध्यक्ष रवी पराते, मेहबूब पठाण, एकनाथ फलके, अझर पटेल, आदित्य मेंढेकर, इंदिरा सैनी आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com