नागपूरकर कुस्तीप्रेमी म्हणतात, गुन्हा सिद्ध होईपर्यंत सुशीलवर कारवाई नको...

सुशीलने खूप कष्टाने आंतरराष्ट्रीय पदके व मानसन्मान मिळविलेला आहे. खुनाचा आरोप झाला म्हणून त्याचा मानसन्मान हिसकावून घेणे योग्य नाही. जे घडले ते अतिशय दुर्दैवी आहे. भूतकाळात अनेक खेळाडू अशा प्रकारच्या अनुभवातून गेलेले आहेत. सुशील खरोखरच गुन्हेगार असेल तर त्याला नक्कीच शिक्षा होईल.
Sushilkumar.
Sushilkumar.

नागपूर : जागतिक कुस्तीमध्ये ज्याने भारताला नावलौकिक मिळवून दिला, असा महान कुस्तीपटू सुशीलकुमार The great wrestler Sushilkumar याच्यावर खुनाचा आरोप लागला आहे. त्यावरून सुशीलकुमारचे समर्थक आणि विरोधक, अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहे. यासंदर्भात नागपूरच्या क्रीडा विश्‍वातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. Nagpur's sports world is also getting various reactions बव्हंशी नागपूरकर कुस्तीप्रेमींनीसुद्धा सुशीलकुमारच्याच Sushilkumar बाजूने कौल दिला आहे.

एक खेळाडू म्हणून सुशीलकुमारने भारतीय कुस्तीला दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्याने ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून देशाच्या लौकिकात भर घातली आहे. अशा गुणी खेळाडूवर केवळ खुनाचा आरोप झाल्यानंतर त्याच्याकडील पदके किंवा मानसन्मान काढून घेणे योग्य नसल्याचे प्रामाणिक मत नागपूरकरांनी व्यक्त केले आहे. सुशीलवरील गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

सागर पहिलवानाच्या मृत्युप्रकरणात प्रमुख आरोपी असलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुशीलकडून पदके व पुरस्कार परत घेण्याविषयी सध्या क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा व मागणी होत आहे. यासंदर्भात नागपुरातील कुस्ती संघटक व पहिलवानांचे मत जाणून घेतले असता, बहुतेकांनी सुशीलवर सध्या तरी अशी कारवाई करू नये, असे सांगितले. क्रीडा संघटक दिलीप इटनकर म्हणाले. ३८ वर्षीय सुशीलने खाशाबा जाधवनंतर भारताला प्रथमच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले होते. याशिवाय जागतिक, आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने पदक जिंकले आहे. 

या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारत सरकारने त्याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च 'राजीव गांधी खेल रत्न' सह पद्मश्री व अर्जून पुरस्काराने सन्मानित केले आहे. देशभरातील युवा खेळाडूंचा तो ‘रोल मॉडेल’ आहे. ही सर्व पदके व मानसन्मान मिळाले, तेव्हा सुशील खुनाचा आरोपी नव्हता. त्याने अत्यंत मेहनतीने ही कमाई केलेली आहे. केवळ आरोप झाला म्हणून त्याच्यावर अशी कारवाई करणे चुकीचे आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच यासंदर्भात कारवाई करणे उचित ठरेल. 

राष्ट्रीय पहिलवान राहिलेल्या नीलेश राऊतनेही जवळपास अशीच भावना व्यक्त केली. नीलेश म्हणतो, सुशीलने खूप कष्टाने आंतरराष्ट्रीय पदके व मानसन्मान मिळविलेला आहे. खुनाचा आरोप झाला म्हणून त्याचा मानसन्मान हिसकावून घेणे योग्य नाही. जे घडले ते अतिशय दुर्दैवी आहे. भूतकाळात अनेक खेळाडू अशा प्रकारच्या अनुभवातून गेलेले आहेत. सुशील खरोखरच गुन्हेगार असेल तर त्याला नक्कीच शिक्षा होईल. तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होऊ नये, असे माझे प्रामाणिक मत आहे. 

नागपूर शहर कुस्तीगीर संघटनेचे सचिव हरिहर भवाळकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय खेळाडू हे युवकांचे प्रेरणास्थान असतात. त्यामुळे त्यांनी आपली ‘इमेज’ नेहमीच जपली पाहिजे. सुशीलच्या बाबतीत जे काही घडले, ते अत्यंत वाईट व वेदनादायक आहे. त्याने असे करायला नको होते. यामुळे त्याच्यासह कुस्तीचीही देशभर बदनामी होत आहे. सुशीलवर झालेले आरोप कितपत सत्य आहे, हे लवकरच बाहेर येणार आहे. तोपर्यंत कारवाईबाबत सरकारने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी, असे मला वाटते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com