माजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यांना भडकवल्यानेच झाले माझे निलंबन...

आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्याने जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना खटकले. रामटेकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेनेचे वर्चस्व आपण मोठ्‍या प्रमाणात कमी केले.
Gajju Yadav Ramtek
Gajju Yadav Ramtek

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका माजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यांना भडकवल्यामुळेच छोट्याशा घटनेचे मोठे भांडवल करून आणि माझ्या विरोधात षड्यंत्र रचून मला निलंबित करण्यात आले, असे रामटेक पंचायत समितीचे माजी सभापती गज्जू उर्फ उदयसिंग यादव Gajju Alis Udaysing Yadav आज पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख सुनील केदार Sunil Kedar आणि राजेंद्र मुळक Rajendra Mulak यांच्यावर होता. निलंबनाविरुद्ध आपण वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. 

आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्याने जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना खटकले. रामटेकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेनेचे वर्चस्व आपण मोठ्‍या प्रमाणात कमी केले. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द होतील, अशांची नावे प्रारंभी देण्यात आली होती. ही बाब लक्षात येताच आपण पर्यायी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांच्याशी आपले कुठलेही भांडण नव्हते. मात्र ते सातत्याने उमेदवारी नाकारल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला पाडू, अशी भाषा करीत होते. आपण उपस्थित असलेल्या बैठकीत तो बोलल्याने कार्यकर्ते खवळले. 

आपल्या भावाने त्याला झापड मारली. नंतर त्यालाच हाताशी धरून काँग्रेसच्या नेत्यांनी आपणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी त्याचा वापर केला. डोक्याला छोटी जखम झाली असताना त्याच्या कपाळावर खाजगी इस्पितळात जाऊन तीन टाके दिले. तत्पूर्वी सव्वालाखे बेदम मारहाणीत गंभीर जखमी झाले, असा वैद्यकीय अहवाल तयार करण्याचा प्रयत्न शासकीय इस्पितळातून करण्यात आला. मात्र सर्वच डॉक्टरांनी नकार दिला. जिल्ह्यातील एका मंत्र्यांना आपणाविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यासाठीसुद्धा पोलिसांवर दबाव टाकल्याचे यादव यांनी सांगितले. 

इस्पितळात असताना स्वाक्षरी कशी 
प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष माणिक जगताप यांच्या स्वाक्षरीने आपणास २४ ऑगस्टला निलंबित करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. जगताप हे एक महिन्यांपासून कोविडमुळे रायगडच्या इस्पितळात दाखल आहेत. दुसऱ्याच दिवशी (ता.२५) त्यांचे निधन झाले. त्यावरून ते किती गंभीर आजारी होते हे दिसून येते. त्यामुळे निलंबन पत्रावरील त्यांची स्वाक्षरी बनावट असल्याची शंका यादव यांनी व्यक्त केली. 

निरीक्षक उपस्थितच नव्हते 
निवडणूक निरीक्षक रणजीत कांबळे यांनी आपणासमोर गज्जू यादव यांनी मारहाण केल्याचे काँग्रेसला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रत्यक्षात ज्या बैठकीत हा प्रकार घडला तेव्हा कांबळे तेथे उपस्थितच नव्हते. ते नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. संबंधित बैठकीला सुमारे दीडशे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात सर्वच आपले समर्थक नव्हते. सर्वांकडे मोबाईल असताना एकानेही या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले नाही. यावरून सर्व अहवाल बोगस तयार केल्याचे स्पष्ट होते, याकडे यादव यांनी लक्ष वेधले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com