लॉकडाऊनबाबात मुंढेच संभ्रमात; आता म्हणाले, जीवनशैली बदला !

मला प्रसिद्धची खूप हौस आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियावर सातत्याने झळकत असतो, असा आरोप केला जातो. मात्र यात काही तथ्य नाही. सर्व फुटेज तपासून बघा. कोविडशिवाय दुसऱ्या कुठल्याच विषयावर आजवर बोललो नाही. जे काही बोललो ते कोरोना व स्वच्छतेविषयीच, असे सांगून त्यांना विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कालपर्यंत कोरोनाच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन लावण्याच्या प्रयत्नात होते. दर दोन-तीन दिवसांआड ते खबरदारीचे ईशारे देत होते. मात्र काल पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लॉकडाऊनपेक्षा लोकांनी जीवनशैली आणि सवयी बदलविल्यास कोरोनावर मात करता येईल. त्यामुळे लॉकडाऊन लावायचा की नाही, याबाबत ते स्वतःच संभ्रमात पडल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री तसेच महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत मुंढे यांनी लॉकडाऊनचा आग्रह धरला होता. पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत मुंढे वगळता सर्वांनीच लॉकडाउनला विरोध केला होता. लॉकडाऊन लाऊ नये, याकरिता महापौर जोशी यांनी दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला जनतेने उत्‍स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यानंतरही मुंढे केव्हाही लॉकडाउन करतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन जबरदस्तीने लॉकडाउन लावल्यास आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता.

सध्या शहरात कोरोना रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन लावणार का? असा प्रश्न मुंढेंना विचारला असता, त्यांनी लॉकडाउन लावल्याने काय फायदा होणार, असा उलट सवाल केला. लॉकडाऊन तोडणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. त्याची बातमी पुन्हा तुम्हीच करणार. शेवटी लॉकडाउनचे यश, अपयश नागरिकांवर अवलंबून आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय काही यशस्वी होऊ शकत नाही. याचा अर्थ लॉकडाउन लावणार नाही असा काढायचा का? असे विचारले असता, ‘मी असे म्हटले नाही, तुम्हीच चुकीचा अर्थ काढत आहात’, असेही मुंढे म्हणाले.

असेल तर १४ दिवसच
मी लॉकडाउन लावल्यास ते १४ दिवसांचेच असेल. त्यात एकही दिवस कमी जास्त होणार नाही. त्याची सूचना चार दिवस आधीच नागरिकांना दिली जाईल, असे ठोस उत्तरही मुंढे यांनी दिले. लॉकडाऊन हा प्रशासनासाठी नाही तर जनतेसाठी आहे. तोंडाला मास्क लावला नाही, जीवनशैली बदलली नाही, नियम पाळले नाही तर लॉकडाऊन करूनही प्रश्न सुटणार नाहीत, असेही ते म्हणाले.

प्रसिद्धीचे आरोप खोडले
मला प्रसिद्धची खूप हौस आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मीडियावर सातत्याने झळकत असतो, असा आरोप केला जातो. मात्र यात काही तथ्य नाही. सर्व फुटेज तपासून बघा. कोविडशिवाय दुसऱ्या कुठल्याच विषयावर आजवर बोललो नाही. जे काही बोललो ते कोरोना व स्वच्छतेविषयीच, असे सांगून त्यांना विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com