खासदारपुत्राच्या पत्नीने केली थेट पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार, लैंगिक छळाचा आरोप... - mps sons wife lodged complaint directly with inspector general of police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

खासदारपुत्राच्या पत्नीने केली थेट पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार, लैंगिक छळाचा आरोप...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 4 सप्टेंबर 2021

मुलाने घरच्या कोणालाही विश्वासात न घेता परस्पर लग्न केले. यावर आम्ही कुठलाही आक्षेप न घेता मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु, दोघांनीही देवळी सोडून वर्धा येथे राहण्याचा निर्णय घेतला. तेथे त्या दोघांत काय झाले माहीत नाही.

वर्धा : भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस BJP's MP Ramdas Tadas यांचा मुलगा पंकज Pankaj याच्या पत्नीने पतीच्या विरोधात लैंगिक छल केल्याची तक्रार थेट पोलिस महानिरीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीत खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस Shobha Tadas and Sunita Tadas यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. या तक्रारीवर पोलिस अधिकारी काय कारवाई करतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज तडस यांनी काही वर्षांपूर्वी वर्ध्यातील एका मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण केले. यात तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने लग्नाची गळ घातल्याने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर ते दोघे देवळीचे घर सोडून वर्धा येथे राहत होते. येथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला व तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलून दिले, असा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. 

ही बातमी वाचा ः खडसेंना धक्का;  जावयाचा जामीन फेटाळला

या तक्रारीवर वर्धा पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असे नमूद करून तिने थेट नागपुरात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस महानिरीक्षकांकडे दिलेल्या या तक्रारीत खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारीत आणखी गंभीर आरोप करण्यात आल्याने यात पोलिस विभाग काय कारवाई करतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

ही बातमी पण वाचा ः गेलेले कामगार परतले, उद्योगांना येताहेत अच्छे दिन...

मुलाने घरच्या कोणालाही विश्वासात न घेता परस्पर लग्न केले. यावर आम्ही कुठलाही आक्षेप न घेता मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु, दोघांनीही देवळी सोडून वर्धा येथे राहण्याचा निर्णय घेतला. तेथे त्या दोघांत काय झाले माहीत नाही. या मुलीने थेट पोलिसात तक्रार केली. पण ती येण्यास तयार नसल्याने आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. तिला आजही घरी घेण्यास आम्ही तयार आहोत. 
- रामदास तडस, खासदार, वर्धा.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख