आमच्याकडे हरामाचा पैसा नाही, पण प्रताप जाधवांच्या संपत्तीची चौकशी ईडीने करावी…

चितोड़ा प्रकरणात खासदार प्रतापराव जाधव यांनी पीडित कुटुंबाकडे पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीची व आमदार संजय गायकवाड यांच्या संपत्तीचीसुद्धा ईडीमार्फ़त चौकशी करावी, अशी मागणी केलीआहे.
Jogendra Kawade
Jogendra Kawade

बुलडाणा : जिल्ह्याच्या खासदारांनी पीडितांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे, आस्थेने विचारपूस करून चौकशी करणे अपेक्षित आहे. पण खासदार प्रताप जाधव MP Pratap Jadhav पीडितांच्या घरी न जाता आरोपीच्या घरी जातात आणि वर आरोप करतात की, या दलितांकडे येवढा पैसा आला कुठून? खरे तर आता खासदार जाधव यांच्या संपत्तीची चौकशी ईडीने केली पाहिजे, mp pratap jadhavs assets should be investigated by the ed  असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. Jogendra Kawade त्यांच्या या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 

खासदार प्रतापराव जाधव दोन दिवस खामगाव येथे मुक्काम ठोकून होते. ते आरोपीच्या घरी गेले, त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. पण पीडितांच्या घरी जावे, असे त्यांना वाटले नाही. कळस म्हणजे खासदार जाधव म्हणाले की, या दलितांकडे गाड्या, घोड्या अन् येवढा पैसा आला कुठून? अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले. खासदार असले तरी त्यांना असे बोलण्याचा अधिकार दिला कुणी? आता ईडीने खासदार जाधवांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे. कारण हा व्यक्ती येवढा धनदांडगा झाला कसा, हे शोधले पाहिजे, अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. 

च्याजवळून लूट, त्याच्याजवळूनही लूट असे धंदे आम्ही केले नाही. यांनी केले म्हणून हे धनदांडगे झाले आणि आता यांना पैशांची मस्ती आली आहेया. आम्ही आणि आमची मंडळी दिवसरात्र कष्ट करते, दोन पैसे कमावते. त्यामुळे आत्ता कुठे थोडेफार चांगले दिवस आले आहेत. शिकले सवरले त्यामुळे चांगले राहण्याचा प्रयत्न आमचे लोक करतात. पण यावरही खासदार प्रताप जाधव यांच्यासारख्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यांच्याकडे येवढा पैसा आला कुठून, याची चौकशी आता करण्याची गरज असल्याचे प्रा. कवाडे म्हणाले. 

चितोड़ा प्रकरणात खासदार प्रतापराव जाधव यांनी पीडित कुटुंबाकडे पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीची व आमदार संजय गायकवाड यांच्या संपत्तीचीसुद्धा ईडीमार्फ़त चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com