खासदार नवनीत राणांनी बडनेरातील लोकांच्या अडचणीवर सुचवला ‘हा’ उपाय - mp navnit rana suggested this solution to the problem of the people of badnera | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

खासदार नवनीत राणांनी बडनेरातील लोकांच्या अडचणीवर सुचवला ‘हा’ उपाय

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

रेल्वे प्रशासनाने आपल्या सर्व हद्दी सिमेंटच्या भिंतींनी सील केल्यापासून बडनेराच्या जुनी आणि नवीन वस्तीतील लोकांना खूप मनस्ताप होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही अडचण सोडवण्याची मागणी होत आहे. पण आतापर्यंत त्याकडे कुणी लक्ष दिले नाही.

नागपूर : अमरावती शहरालगत असलेल्या बडनेरा जुनी वस्ती आणि नवीन वस्तीच्या मध्ये रेल्वे प्रशासनाने भिंती बांधल्या आहेत. त्यामुळे जुनी वस्ती आणि नवीन वस्तीतील Old settlements and new settlements नागरिकांना आवागमन करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. यावर दोन्ही वस्त्यांना जोडणारा भुयारी मार्ग किंवा पादचारी पुल तयार करावा, An underpass or pedestrian bridge should be constructed connecting the two settlements अशी सूचना खासदार नवनीत राणा MP Navnit Rana  यांनी भुसावळ रेल्वे मंडळाचे प्रबंधक विवेक गुप्ता यांना केली आहे. 

यासंदर्भात खासदार राणा यांनी श्री गुप्ता यांना पत्र दिले आहे. युवा स्वाभिमान शिष्टमंडळाने आज विवेक गुप्ता यांची बडनेरा येथे भेट घेऊन पत्र दिले. विवेक गुप्ता आज बडनेरा पाहणी दौऱ्यावर आले आहेत. बडनेरा, अमरावती व नवीन अमरावती रेल्वे स्थानकांच्या सुधारणांसंदर्भात व प्रवाशांच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. रेल्वे प्रशासनाने बडनेरा येथील जुनी वस्ती व नवी वस्ती येथील आपल्या हद्दी सर्व बाजूंनी सील केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता महामार्गावरील वर्दळीच्या पुलावरून जीव धोक्यात टाकून फेरा मारून जावे लागते.

शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, सायकल चालक यांना प्रचंड त्रास होतो. म्हणून या दोन्ही भागांना जोडून आवागमन सोपे व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग किंवा पादचारी पूल बांधावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केली आहे. डिआरएम यांनी यावर लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्‍वासन उपस्थितांना दिले. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, झेड.आर.यु,सी.सी. सदस्य नानकराम नेभनानी, अजय जयस्वाल, डिआरयुसीसी सदस्य नितीन बोरेकर, विलास वाडेकर, आयुब, प्रवीण सावळे आफताब, सिदार्थ बनसोड, पराग चिमोटे, पवन हिंगणे, शुभम हिंगणे, राहुल काळे, कमरोद्दीन  भाई, सचिन सोनोने आदी उपस्थित होते.

हेही वाचा : उपराजधानीत बिबट्याची दहशत, सहा दिवसांपासून वनविभागाला देतोय हुलकावणी...  

रेल्वे प्रशासनाने आपल्या सर्व हद्दी सिमेंटच्या भिंतींनी सील केल्यापासून बडनेराच्या जुनी आणि नवीन वस्तीतील लोकांना खूप मनस्ताप होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही अडचण सोडवण्याची मागणी होत आहे. पण आतापर्यंत त्याकडे कुणी लक्ष दिले नाही. येथील लोकांना आमदार रवी राणा यांना ही समस्या सांगितली. त्यानंतर त्यांनी खासदार राणा यांच्या माध्यमातून ही समस्या कायमस्वरूपी निकाल काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता भुयारी मार्ग किंवा पादचारी पुल लवकरात लवकर करण्याचे आश्‍वासन विवेक गुप्ता यांनी दिले आहे. त्यामुळे बडनेरामधील लोकांना दिलासा मिळणार आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख