खासदार नवनीत राणांनी ठेल्यावर बनवला डोसा, अन् टपरीवर घेतला चहा…

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जनतेमध्ये मिसळल्या की त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. अधूनमधून कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्या जनतेमध्ये मिसळतात, चर्चा करतात आणि लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतात.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

अमरावती : अमरावती शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी निघालेल्या खासदार नवनीत राणा MP Navnit Rana यांनी आज ठेल्यावर स्वतः दोसा बनवला आणि टपरीवर चहासुद्धा प्याल्या. यावेळी रस्त्याच्या कडेला लहानमोठे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांशीही त्यांनी चर्चा केली She also held discussions with shopkeepers आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

अमरावती शहरातील अनेक भागांत सद्यःस्थितीत विकासाची विविध कामे जोरात सुरू आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी त्यांनी आज शहराचा दौरा केला. यादरम्यान भेटलेल्या शहरवासीयांशी त्यांनी गोष्टी केल्या. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ठेल्यावर त्यांनी सर्वांसाठी दोसा घेतला आणि स्वतःही तेथे दोसा बनवला. त्यानंतर तेथेच त्यांनी चहाचासुद्धा आस्वाद घेतला. तेथील दुकानदारांशी त्यांनी चर्चा केली. कोरोनाच्या काळात धंद्याला कसा फटका बसला हे लोकांनी खासदार राणा यांना सांगितले. त्यावर आगामी काळात लहान उद्योग चालविणाऱ्यांसाठी काय उपाययोजना करता येतील, याबद्दल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या उद्योगांसोबत लहान दुकानदारांनाही मोठा फटका बसला. अनेकांचे व्यवसाय बंद असल्यामुळे मिळेल ते काम करून लोकांना आपल्या कुटुंबाचे भरणपोषण केले. त्यानंतर पुन्हा दुकाने सुरू झाल्यानंतर त्यांना थोडा दिलासा मिळाला. पण अजूनही त्यांच्या संसाराचा गाडा रुळावर आलेला नाही. नवनीत राणांनी अशा व्यावसायिकांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांना दिलासा दिला. यामुळे परिसरातील दुकानदार भारावून गेले होते. भाजीच्या दुकानावरून भाजी घेतल्यावर दुकानदार त्यांच्याकडून पैसे घेत नव्हते. पण त्यांनी जबरदस्तीने घेतलेल्या वस्तूंचे पैसे त्यांना दिले. 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जनतेमध्ये मिसळल्या की त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. अधूनमधून कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्या जनतेमध्ये मिसळतात, चर्चा करतात आणि लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतात. नंतर त्या सोडविण्यासाठी त्या काम करतात. त्यामुळेच ॲक्टीव्ह खासदार अशी आपली ओळख त्यांनी मतदारसंघात निर्माण केली आहे. मेळघाटमधील प्रश्‍नांबाबतही त्या नेहमी जागरूक असतात. आमदार खासदार मेळघाटच्या दुर्गम गावांमध्ये येऊनही पाहात नाही, ही तक्रार त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी निकाली काढली आहे. याशिवाय जनतेच्या प्रत्येक सण-उत्सवांमध्येही त्या सहभागी होतात. आज शहराचा फेरफटका मारताना खासदार राणा यांनी सामान्य लोकांची आस्थेने केलेली विचारपूस शहरात चर्चेचा विषय ठरली.  
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com