अस्वस्थ वाटू लागल्याने खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले 

तज्ज्ञ डॉक्टरांची चमू नवनीत राणा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा व त्यांचे आई-वडील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावरही नागपूरला ओक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यापासून उपचार सुरू आहेत.
Navnit Rana
Navnit Rana

अमरावती : गेल्या आठवड्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर त्यांच्या घरातील सर्व सदस्य कोरोनाबाधित झाले. यातून त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा व त्या स्वतः बचावल्या होत्या. पण नंतर या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. आमदार रवी राणा नागपुरला आई-वडीलांच्या सेवेत असताना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना नागपुरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना काल अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला ‘वोक्हार्ट’मध्ये हलविल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल, सोमवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार नवनीत राणा रात्री नागपूरकडे रवाना झाल्या असून त्यांना नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

तज्ज्ञ डॉक्टरांची चमू नवनीत राणा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा व त्यांचे आई-वडील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावरही नागपूरला ओक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यापासून उपचार सुरू आहेत. त्यांच्याच कुटुंबातील इतर सदस्यांवर मात्र अमरावती येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com