खासदार धानोरकरांमुळे पुलय्यांवर दाखल झाला गुन्हा, आशा घटेला न्याय मिळणार... - mp dhanorkar insists and police file charge against puliyya, asha ghate will get justice | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार धानोरकरांमुळे पुलय्यांवर दाखल झाला गुन्हा, आशा घटेला न्याय मिळणार...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 एप्रिल 2021

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. येथील मूळ ओबीसी समाजाच्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्या आहे. परंतु न्याय मागण्याकरिता वेकोलि अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर परप्रांतीय वेकोलि अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून घेत नाही. त्यांना या प्रकल्पग्रस्तांशी काही देणे घेणे नसते.

चंद्रपूर : वेकोलिच्या पौनी ३ प्रकल्पातील सास्ती येथील प्रकल्पग्रस्त १९ वर्षीय युवती आशा तुळशीराम घटे हिने वेकोलि अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलय्या यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी सूर्यकांत खनके यांनी केली आहे.  

यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी  प्रा. सुर्यकांत खनके, अजय वैरागडे, प्रकाश देवतळे, गोवील मेहरकुरे, कपिल वैरागडे, सचिन कुंभलकर, जितेंद्र इटनकर, निलेश बेलखोडे, रवी लोणकर, भजन तपासे, नितेश जुमडे, राजेंद्र रघाताटे, शैलेश जुमडे, छबु वैरागडे, वंदना येरणे, वैशाली मेरजे, सुवर्णा लोखंडे, पूनम खनके यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. येथील मूळ ओबीसी समाजाच्या या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्या आहे. परंतु न्याय मागण्याकरिता वेकोलि अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर परप्रांतीय वेकोलि अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून घेत नाही. त्यांना या प्रकल्पग्रस्तांशी काही देणे घेणे नसते. त्यामुळे आजवर अनेक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. येथील प्रकल्पग्रस्त अनेक पिढ्या ह्या भूमिहीन झालेला आहे. अनेक पिढ्या ह्या उघड्यावर पडलेल्या आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि अधिकारी म्हणून मूळचे मराठी अधिकारी देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. 

हेही वाचा : धक्कादायक : नेत्याच्या घरी सापडले EVM अन् व्हिव्हिपॅट  

सास्ती येथील मृतक आशा तुळशीराम घटे हिच्या वडिलांची शेती वेकोली कडून संपादित करण्यात आली होती. स्व. आशा घटे ही वेकोलिमार्फत लाभार्थी असल्यामुळे नोकरी संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता वेकोलिचे योजना अधिकारी जी. पुलय्या यांनी बोलावल्यानुसार धोपटला येथील वेकोलि कार्यालयात गेली होती. यावेळी पुलय्या यांनी आशा घटे हिला अपमानास्पद वागणूक दिली व त्यामुळे तिने सास्ती येथील घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करून मृतक आशा तुळशीराम घटे हिला न्याय मिळवून देऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी तेली समाजाकडून करण्यात आली आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख