`मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे, हा तर महाराष्ट्राचा अपमान`

मराठा समाजासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार रीट पिटीशन दाखल करणार आहे. कुणी कसाही अपप्रचार केला तरी आम्ही मराठा समाजासोबत आहोत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
Sambhaji Raje - Uday Samant - Modi
Sambhaji Raje - Uday Samant - Modi

भंडारा : जवळपास दीड वर्ष उलटून गेले. या कालावधीत राजघराण्यातील संभाजी राजे Sambhaji Raje यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Prime Minister Narendra Modi ३ ते ४ पत्र पाठविली. पण मोदींना त्यांना अद्यापही भेटीला वेळ दिला नाही. संभाजी राजेंना अशी वागणूक देणे म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, This is the insult of Maharashtra असे राज्याचे माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत Uday Samant आज म्हणाले. 

मंत्री सामंत म्हणाले, यामागे मोदींची काय मानसिकता आहे, हे मी सांगू शकत नाही. पण राजेंना १ ते दीड वर्ष भेट न देणे हा आपल्या सर्वांचाही अपमान आहे. याबद्दल छत्रपती संभाजी राजेंना काय वाटतं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न असू शकतो. त्यांनी कमालीचा संयम बाळगला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेचा हा अपमान आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. आज गोंदीया दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

‘हे’ विभागाने कधीही सांगितले नव्हते
विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होतील, हे विभागाने कधीही सांगितले नव्हते. विद्यापीठाच्या परीक्षा झालेल्यादेखील आहेत. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी एका पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहे. या समारंभाला राज्यपालदेखील राहणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ आहे. विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या. त्याचे निकालही दिले आहेत. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आज जो पुण्यातला कार्यक्रम आहे, असे चार कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कुठेही झालेला नाही. ऑनलाइन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व परीक्षा घेतलेल्या आहेत, असे मंत्री सामंत म्हणाले. 

प्राध्यापक भरती लवकरच
राज्यात प्राध्यापक भरती लवकरच होणार आहे. तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढविणार आहोत. प्रोफेशनल कोर्सेसची सीईटी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. दुसरी लाट भयावह होती. मात्र आता हायकवार कमिटीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून ती फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. दोन-तीन दिवसांत मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, तर तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत, तर त्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी सरकार मराठा समाजासोबत
मराठा समाजासोबत संपूर्ण महाविकास आघाडी सरकार असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार रीट पिटीशन दाखल करणार आहे. कुणी कसाही अपप्रचार केला तरी आम्ही मराठा समाजासोबत आहोत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com