आमदार ठाकरे म्हणाले, हिवाळी अधिवेशन रद्द करा !

उच्च न्यायालायानेसुद्धा कोरोना उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगून क्रीडा संकुल येथे हजार खाटांचे इस्पितळ निर्माण करण्याचे आदेश दिले आहे. अशा परिस्थितीत अधिवेशन भरवल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Vikas Thakre
Vikas Thakre

नागपूर : कोरोनाचे भयावह रूप नागपूरकर बघत आहेत. बाधित आणि मरणाऱ्यांची संख्या काही केल्या आटोक्यात येत नाहीये. जनता रोज जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहे. लोक दहशतीखाली आले आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये डिसेंबर महिन्यात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करावे आणि अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी द्यावा, अशी मागणी पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

मागील हिवाळी अधिवेशनाचा सहा दिवसांच्या खर्च ७५ कोटींच्या आसपास होता. सध्या कोरोना रुग्णांची संख्या तसेच विदर्भात असलेल्या तोकडी वैद्यकीय यंत्रणा बघता अधिवेशनाऐवजी यंदाचा सर्व खर्च वैद्यकीय सोयीसुविधांसाठी दिल्यास अधिक योग्य होईल. एकट्या नागपूर शहराचा विचार करता दररोज सुमारे एक ते दीड हजार रुग्णांची भर पडत आहे. तसेच मृत्यूंची संख्या अठराशेच्या घरात पोचली आहे. मेयो आणि मेडिकल असे दोन मोठे इस्पितळ येथे आहेत. नागपूरच नव्हेतर संपूर्ण विदर्भाचा भार या दोन्ही इस्पितळांवर पडत आहे. त्यामुळे येथील उपलब्ध मनुष्यबळ कोरोनाचा सामना करण्यासाठी अपुरे पडत आहे. सध्या कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी येथील खाटा अपुऱ्या पडत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहेत. महापालिकेकडे सुसज्ज यंत्रणा नाही. खासगी इस्पितळांमध्ये आकारली जाणारी रक्कम सर्वसामान्यांना परवडणारी नाही. 

उच्च न्यायालायानेसुद्धा कोरोना उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगून क्रीडा संकुल येथे हजार खाटांचे इस्पितळ निर्माण करण्याचे आदेश दिले आहे. अशा परिस्थितीत अधिवेशन भरवल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार निवास, रविभवन येथे कोविड सेंटर स्थापन केले आहे. अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो पोलीस, अधिकारी व कर्मचारी येतात. त्यांच्या राहण्याची व खाण्याची सुविधा सरकारला करावी लागते. अशा परिस्थितीत अधिवेशन घेणे परिस्थितीशी सुसंगत नाही. त्यापेक्षा अधिवेशनावर होणार कोट्यवधींचा खर्च आरोग्य सेवा व सुविधांसाठी दिल्यास जनतेला जास्त आनंद होईल. त्यामुळे आपल्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी   विनंती विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.  
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com