आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आणखी १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर.. 

आमदार निधीतून ८ रुग्णवाहिका, शासकीय रुग्‍णालयाला १७ व्‍हेंटीलेटर व १५ एन.आय.वी. त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर जिल्ह्यात ५ लक्ष मास्‍कचे वितरण करण्यात आले आहे. येवढेच नाही तर मागणी नुसार फेसशिल्‍डचे वितरणही केले आहे.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार Former Finance Minister MLA Sudhir Mungantiwar यांच्या प्रयत्नातून आणखी १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 15 Oxygen concentrator कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही संख्या आता १६७ झाली आहे. यापूर्वी १५२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. राज्यात तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे. A third wave is expected in the state त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्‍य सेवा सर्व   सोयीसुविधांयुक्‍त व्‍हाव्‍या, यासाठीची ही तयारी असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 

कोरोना महामारीचं दुस-या लाटेचं संकट कमी होत आहे. तरीही सावधानी व खबरदारी घेण्‍याची आवश्‍यकता आहे. म्हणून भाजपच्‍यावतीने आज शासकीय विश्रामगृहात एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या माध्‍यमातून व आमदार मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्नांतून प्राप्‍त झालेल्‍या १५ ऑक्सिजन कॉन्‍सन्‍ट्रेटरचे वितरण विविध सेवाभावी संस्‍थांना करण्यात आले. यावेळी भाजप महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्‍थायी समिती अध्‍यक्ष रवी आसवानी, माजी आ. अॅड. संजय धोटे, भाजप महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभुषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर,  प्रशांत विघ्‍नेश्‍वर, मंडळ अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार, विठ्ठलराव डुकरे, रवी लोणकर, संदीप आगलावे, नगरसेवक छबुताई वैरागडे, रामकुमार आकापेल्‍लीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यापूर्वी आमदार निधीतून ८ रुग्णवाहिका, शासकीय रुग्‍णालयाला १७ व्‍हेंटीलेटर व १५ एन.आय.वी. त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर जिल्ह्यात ५ लक्ष मास्‍कचे वितरण करण्यात आले आहे. येवढेच नाही तर मागणी नुसार फेसशिल्‍डचे वितरणही केले आहे. आज चंद्रपूरातील गजानन महाराज मंदिराचे संदीप देशपांडे यांना २, सिंदेवाही तालुक्‍यातील पळसगाव जाटसाठी येथील उदासी सेवा संस्‍थांचे चोखादास अलमस्‍त यांना २, चंद्रपूरातील बाल गणेश मंडळाच्‍या छबुताई वैरागडे यांना २, उपमहापौर राहुल पावडे यांना १, कोरपना तालुक्‍यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अॅड. संजय धोटे यांना २, चंद्रपूरातील लिंगायत बहुउद्देशीय सेवा संस्‍थेच्‍या संजय धारणे व महेश व्‍यवहारे यांना प्रत्येकी १, भद्रावतीसाठी भाजयुमोचे इम्रान खान यांना १ व चंद्रपूर भाजपा अल्‍पसंख्‍याक मोर्चाचे अमिन शेख यांना १, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी करिता सुनील मेहेर व अमित बिश्‍वास यांना प्रत्येकी ३ याप्रमाणे १५ ऑक्सिजन कॉन्‍सन्‍ट्रेटरचे वितरण आज करण्यात आले. आतापर्यंत एकूण १६७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविड रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com