आमदार रोहित पवारांनी नागपूरसाठी पाठवले ३८ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, पहिल्या लाटेतही पाठवले होते सॅनिटायजर

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी नागपूरसाठी एक टॅंकर सॅनिटायजर पाठवले होते. त्याची आठवण ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळताच नागपूरकरांना झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यावर्षीही ते नागपूरसाठी मदत पाठवायला विसरले नाहीत. नागपूर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर संबंधितांच्या सुपूर्द केले.
Rohit Pawar
Rohit Pawar

नागपूर : कोरोनाच्या संकट काळात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी प्राणवायूची Oxygen concentrator अतोनात गरज भासत आहे. प्राणवायूअभावी अनेकांचे प्राण जात आहेत. ही बाब लक्षात घेत प्रत्येक नागरिकाला प्राणवायू मिळावा, Every citizen should get oxygen या उद्देशाने आमदार रोहित पवार MLA Rohit Pawar यांनी थेट बारामतीहून नागपूरकरांसाठी ३८ प्राणवायू कॉन्सेंट्रेटर मोफत पाठवले Sent 38 oxygen concentrators free आणि सामाजिक बांधीलकी जपली आहे.

शहर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हस्ते १८ प्राणवायू कॉन्सेंट्रेटर विभागीय आयुक्त आणि २० महापालिका आयुक्तांना सुपूर्द करण्यात आले. राज्यात विविध जिल्ह्यांत ५०० हून अधिक प्राणवायू कॉन्सेंट्रेटर बारामती ॲग्रोतर्फे पाठवण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार सतत कार्यरत आहेत. काम केवळ आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघापुरतेच मर्यादित न ठेवता राज्यस्तरावरही ते विविध प्रयत्न करत आहेत. 

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पुरवण्यात येणा-या या प्राणवायूकॉन्सेंट्रेटरमुळे सध्या कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने आवश्यक असणारी प्राणवायूचा तुटवडा काही प्रमाणात गरज भागवण्यास मोठी मदत होणार आहे. कोरोनाच्या या संकटमय परिस्थितीत आ. रोहित पवारांच्या या सामाजिक बांधीलकीमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्यासह शहरअध्यक्ष अनिल अहिरकर, दुनेश्वर पेठे, आभा पांडे, लक्ष्मी सावरकर, अर्चना हरडे, महेन्द्र भांगे, पूनम रेवतकर, श्याम मंडपे, अशोक काटले, सैय्यद सुफियान, अनिल बोकड़े, सनी अंसारी यावेळी उपस्थित होते. यावेळी तिवारी म्हणाले आमदार पवार हे नेहमी नागपूरकरांसाठी निस्वार्थ भावनेने मदत देत असतात. 

पहिल्या लाटेत पाठवले होते सॅनिटायजर
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही त्यांनी नागपूरसाठी एक टॅंकर सॅनिटायजर पाठवले होते. त्याची आठवण ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मिळताच नागपूरकरांना झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यावर्षीही ते नागपूरसाठी मदत पाठवायला विसरले नाहीत. नागपूर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर संबंधितांच्या सुपूर्द केले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com