आमदार रवी राणा ‘पीएम केअर फंड’मधून करणार तिसऱ्या लाटेचा सामना...

अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यात आमदार राणा यांनी चांदुर बाजार, नेरपिंगळाई, तिवसा आदी तालुक्यांना भेटी दिल्या आणि तेथील रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांची पाहणी केली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा ते करीत आहेत.
Ravi Rana
Ravi Rana

नागपूर : कोरोना महामारीच्या काळात प्रशासकीय यंत्रणेतील सर्व लोक आणि डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. दुसरी लाट बऱ्यापैकी निवळली असली तरी धोका अजून टळलेला नाही. Although the second wave has largely subsided, the danger has not yet passed तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तिसरी लाट येऊ घातली आहे आणि या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार आहे. The biggest risk is going to be young children त्यामुळे पीएम केअर फंडामध्ये आलेल्या निधीचा उपयोग करून तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी आपण करणार आहोत, असे अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा MLA Ravi Rana  म्हणाले. 

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील रुग्णालयाला आज आमदार राणांनी भेट दिली. तेथील व्यवस्थेची पाहणी केली. डॉक्टर्स आणि रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर तेथील कमतरताही त्यांच्या लक्षात आल्या. ते म्हणाले रुग्णालयाची इमारत चांगली आहे, परिसरही चांगला आहे. पण येथे ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचीदेखील आवश्‍यकता आहे. सोबत आयसीयू आणि ऑक्सिजन सिलिंडरचीसुद्धा व्यवस्था लहान मुलांच्या दृष्टीने करावी लागणार आहे. ही सगळी व्यवस्था पीएम केअर फंडामधून खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे ते म्हणाले. 

याशिवाय या रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व स्टाफ मिळून उपकरण आणि औषधांची जी यादी देतील, त्याप्रमाणे व्यवस्था करून दिली जाणार आहे. आज पाहणी केली तेव्हा या रुग्णालयात सारीचे तीन रुग्ण आढळले, तीन रुग्णांना ऑक्सिजन लागलेला आहे. काही कोरोनाचे रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत. डॉक्टरांचे काम अगदी उत्तम चालले आहे. त्यांना आवश्‍यक सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करून देऊन त्यांचा उत्साह वाढविला जाणार आहे. अगदी याच धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था उभी केली जाणार आहे. खासदार नवनीत राणा आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यात आमदार राणा यांनी चांदुर बाजार, नेरपिंगळाई, तिवसा आदी तालुक्यांना भेटी दिल्या आणि तेथील रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांची पाहणी केली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा ते करीत आहेत. तेथील सरपंच, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि सर्व पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करीत आहेत. स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आणखी काय काय करता येऊ शकते, यासाठी प्रयत्न करून पीएम केअर फंडामधून काय व्यवस्था करायची आहे, याच्या याद्याच त्यांनी तालुक्यातील डॉक्टर्स आणि पदाधिकाऱ्यांकडून मागविल्या आहेत. या पद्धतीने कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच तिचा सामना करण्यासाठी यंत्रणा तयार असली पाहिजे, असे प्रयत्न करीत असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com