कुटासामध्ये आमदार मिटकरींची प्रतिष्ठा पणाला, त्यात सावरकरांची टोलेबाजी... - mla mitkaris reputation is tarnished in kutasa sawarkars gangsterism | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

कुटासामध्ये आमदार मिटकरींची प्रतिष्ठा पणाला, त्यात सावरकरांची टोलेबाजी...

जयेश गावंडे
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर आमदार मिटकरींनी उमेदवार उभे केले आहेत. गावात एकूण 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर तीन पॅनलही रिंगणात आहेत.

अकोला : अकोट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायत निवडणूक विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यावर जे जनतेमध्ये न जाता थेट आमदार झाले, त्यांना निवडणूक काय माहिती, असा टोला मारून आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे कुटासामध्ये आमदार मिटकरींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कुटासा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि भाजप अशी युती झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढत आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षांच्या चिन्हावर लढली जात नसली तरी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे भवितव्य ही निवडणूक ठरवत असते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभर आपल्या वक्तृत्वाचा करिश्‍मा दाखविणारे मिटकरी कुटासामध्ये करिश्‍मा दाखवतील का, यावर राजकीय जाणकारांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यातही कॉंग्रेस आणि भाजपने युती करुन त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मिटकरी हे आव्हान पेलू शकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर आमदार मिटकरींनी उमेदवार उभे केले आहेत. गावात एकूण 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. इतर तीन पॅनलही रिंगणात आहेत. यात काँग्रेसचा देशमुख गट आणि भाजपचा विजयसिंह सोळंके यांचा गट आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र पॅनल उभं आहे. सोबतच युवक काँग्रेसचा कपील ढोके गट आणि शिवसेनेच्या संतोष जगताप यांचेही पॅनल रिंगणात आहे. त्यामुळे मिटकरींसमोर हे तगडे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. 

इकडे अकोला तालुक्यातील पळसोबडे हे आमदार रणधीर सावरकर आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे गाव येथे. आज दोघांनीही येथे मतदान केले. सावरकर हे विधानसभेचे आमदार आहेत आणि मिटकरी थेट विधानपरिषदेवर आमदार झाले आहे. त्यामुळेच जनतेतली निवडणूक कशी असते, हे आता मिटकरींना माहिती होईल, असा टोला सावरकरांनी त्यांना हाणला आहे. रात्री रात्री ११ वाजता लोकांच्या घरी जाणे ही ग्रामपंचायत निवडणुकीत आमची परंपराच नाही. संजय धोत्रेजी सुद्धा असं कधी करत नाही, असे म्हणत आमदार सावरकरांनी मिटकरींवर टिका केली. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख