आमदार जोरगेवारांचा दणका, वेकोलि ‘त्या’ जागा भरणार...

वेकोलित रोजगार मिळण्याची आशा सोडलेल्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यापूर्वीही आमदार जोरगेवार यांच्या आंदोलनानंतर वेकोलिच्या वतीने ३३३ माईनिंग सरदार पदाच्या जागा भरण्यात आल्या होत्या.
Kishor Jorgewar
Kishor Jorgewar

नागपूर : वेकोलित पदभरती प्रक्रिया राबवून रिक्त जागा भराव्या आणि यामध्ये विदर्भातील युवकांना प्राधान्य द्यावे, या मागणीकरिता आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलिच्या नागपूर येथील सीएमडी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. दणक्यात निघालेल्या मोर्चाची दखल घेण्यात आली असून एका महिन्यात वेकोलिअंतर्गत येणाऱ्या-या विविध विभागांतील रिक्त जागांची पदभरती करण्याचे आश्वासन सीएमडी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. 

आमदार जोरगेवार यांच्यासह सीएमडी कार्यालयातील अधिका-यांनी बैठक घेतली असून या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले. यावेळी नागपूर विभागाचे सीएमडी मनोज कुमार यांची उपस्थिती होती. चंद्रपूरात वेकोलिचे जाळे पसरले आहे. याचा मोठा दुष्परिणाम प्रदुषणरुपाने चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. असे असले येथीलच युवकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे वेकोलित रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, या मागणीकरिता ५ जानेवारीला आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 

या मोर्चात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन नागपूर विभागाचे सीएमडी यांना देण्यात आले होते. यावर चर्चा करण्यासाठी सीएमडी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चा दरम्यान केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत वेकोलितर्फे विविध विभागांत रिक्त जागांची पदभरती करण्याचे आश्वासन या बैठकीत सीएमडी मनोज कुमार यांनी आमदार जोरगेवार यांना दिले. यावेळी वेकोलिच्या अखत्यारीत येणा-या विविध विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.

सीएमडी मनोज कुमार यांच्या आश्वासनानंतर आता वेकोलित रोजगार मिळण्याची आशा सोडलेल्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यापूर्वीही आमदार जोरगेवार यांच्या आंदोलनानंतर वेकोलिच्या वतीने ३३३ माईनिंग सरदार पदाच्या जागा भरण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनाला यश आले असून त्यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर वेकोलि प्रशासने नमते घेतल्याचे दिसते. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com