आमदार जयस्वालांनी मानले अनंत गुढेंचे आभार अन् म्हणाले ‘देर है, अंधेर नहीं...’ - mla jaiswal thanked anant gudhe and said it is late not dark | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

आमदार जयस्वालांनी मानले अनंत गुढेंचे आभार अन् म्हणाले ‘देर है, अंधेर नहीं...’

अतुल मेहेरे
सोमवार, 19 जुलै 2021

माजी खासदार अनंत गुढे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवणे, हा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

नागपूर : शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे Asok Shinde यांनी पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये Congress प्रवेश घेतल्यानंतर विदर्भात शिवसेनेला भगदाड पडल्याचे बोलले जात असतानाच रामटेकचे चार टर्मचे आमदार आशिष जयस्वाल MLA Ashish Jaiswal हेसुद्धा सेनेवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. जयस्वाल शिवसेना सोडण्याचाही विचार करू शकतात, असेही सांगितले जात आहे. यावर त्यांना विचारणा केली असता, शिवसेनेमध्ये ‘देर हो सकती है, पर अंधेर नहीं...’. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. He replayed that, it is late not dark.

‘सरकारनामा’शी बोलताना आमदार जयस्वाल म्हणाले, माजी खासदार अनंत गुढे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवणे, हा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रामटेकला मंत्रिपद मिळाल्यास त्याचा फायदा पूर्व विदर्भाला होणार आहे. पूर्व विदर्भातील सर्व विधानसभा मतदारसंघांवर भगवा फडवण्यासाठी तत्पर आहो. त्यासाठी कार्यकर्ते तयार बसले आहेत. पक्षाने ताकद दिल्यास बाळासाहेबांचे स्वप्न निश्‍चितच पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उर्वरित कार्यकाळात पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला बळ मिळेल. 

काय म्हणाले होते माजी खासदार गुढे ?
आशिष जयस्वाल हा कट्टर शिवसैनिक आहे. पक्षाशी प्रामाणिक आहे. अधिकृत तिकीट मिळालेली नसतानाही ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर आजही पक्षासोबत आहेत. आमचा पक्ष म्हणजे आमचे घर आहे आणि आपल्या घरात प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांनीही ती व्यक्त केली आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारात पक्षनेतृत्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा विचार नक्की करतील, असा विश्‍वास अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केला होता. 

आमदार संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही. आपले सरकार असताना पक्षाच्या विस्तारासाठी मंत्रिपदाची गरजही खासदार गुढे यांनी कबूल केली आणि पक्षनेतृत्व याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असेही सांगितले. आशिष जयस्वालांना सध्याही राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्यामध्ये जयस्वाल यांचा नंबर लागेल, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा : केंद्राने ओबीसी आरक्षणावर  भूमिका न घेतल्यास आंदोलन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठल्याही प्रशासकीय आणि संविधानिक कामाचा अनुभव नसतानासुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून कोरोनाच्या काळात त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगले निर्णय घेतले. त्यामुळे भाजपचे पोट आता जास्तच दुखू लागले आहे. आता केवळ वाट पाहणेच भाजपच्या नशिबी आहे. त्यामुळे आता त्यांनी नसती उठाठेव करू नये, असा सल्लाही अनंत गुढे यांनी भाजप नेत्यांना दिलेला आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख