आमदार भांगडियांनी घेतला देशमुखांकडे चहा, अन् भाजपमध्ये पुन्हा उठले वादळ..?  - mla bhangidya took tea at deshmukhs house and the storm arose again in bjp | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार भांगडियांनी घेतला देशमुखांकडे चहा, अन् भाजपमध्ये पुन्हा उठले वादळ..? 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 जून 2021

गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये वसंता देशमुख यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे देशमुखांच्या घरी गेलो होतो. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली का, असे विचारले असता, त्यांच्यासोबत चहा घेतला, असे ते म्हणाले. 

नागपूर : चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये Chandrapur Municipal Corporation भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक येथे केव्हाही होऊ शकते. सत्ताधारी भाजपमध्ये सरळ सरळ दोन गट पडले आहेत आणि त्यातच भाजपचे चिमूर येथील आमदार बंटी भांगडिया MLA Bunty Bhangdiyia यांनी आज महापालिकेतील सत्तापक्षनेते वसंता देशमुख Ruling Party Leader Vasanta Deshmukh यांच्या घरी चहा घेतला. ही भेट केवळ चहा पिण्यासाठी नव्हती, हे कुणीही सांगू शकेल. त्यामुळे या चहानंतर भाजपमध्ये पुन्हा वादळ उठण्याची चिन्हे दिसत आहेत. After tea there are signes of another storm in the BJP.

भाजपाचे महानगर पालिकेतील गटनेते वसंता देशमुख मागील काही दिवसांपासून पक्षनेतृत्त्वावर नाराज आहेत. त्याचे पडसाद काेणत्याही क्षणी हाेवू घातलेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. आता देशमुख यांना पक्षातंर्गत विराेधकांचाही पाठींबा मिळत आहे. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी आज देशमुख यांची भेट. या भेटीत देशमुख यांच्या पाठीशी उभे राहण्याचा शब्द भांगडिया यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर असे दोन गट पडले असल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या काही कार्यक्रमांमध्ये लोकांना त्याची प्रचितीही आली आहे. 

स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीपासून महानगरपालिकेत भाजप नगरसेवकांचे दाेन गट झाले आहेत. गटनेते, सभागृह नेते आणि सलग चारवेळा निवडून आल्यानंतरही शेवटच्या क्षणी देशमुख यांच्याऐवजी रवि आसवानी यांना सभापतीपद मिळाले. तत्पूर्वी सभापतीपदाचे ठाेस आश्वासन देशमुख यांना देण्यात आले हाेते. त्यासाठी त्यांच्याकडून सभागृह नेतेपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र त्यांना डावलले. तेव्हापासून देशमुख नाराज आहेत. मनपाचे भाजपातील राजकारण केवळ चार लाेक चालवितात. इतरांना विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नगरसेवकसुद्धा नाराज आहेत. त्यातूनच दाेन गट पडले.

आसवानी यांच्या सभापतीपदाची मुदत एप्रिल महिन्यात संपली. काेराेनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. आता काेणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात. त्यामुळे देशमुख यांनी मेार्चेबांधणी सुरू केल्याचे बाेलले जात आहे. काही दिवसांपूर्वी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी भाजपचे काही नगरसेवक आपल्याला भेटले असा दावा केला हाेता. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता पसरली. डॅमेज कंट्राेलसाठी भाजपच्यावतीने पटाेले यांच्या विराेधात पाेलिसांत तक्रार करण्यात आली.

दरम्यानच्या काळात काॅग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी देशमुख यांची भेट घेतली. त्यांना काॅग्रेस मध्ये येण्याचे आमंत्रण दिले आणि आता भाजपचे आमदार बंटी भांगडिया थेट त्यांच्या घरी पाेचले. त्यांना देशमुख यांना स्थायी समितीच्या निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. काेणत्याही मदतीसाठी तयार असल्याचे आश्वासन दिल्याचे समजते. देशमुख गटनेते आहेत. स्थायी समितीच्या रिक्त हाेणाऱ्या जागेवर कुणाला पाठवायचे याचा निर्णय तेच घेणार आहेत. त्यामुळे भाजपमधील एक गट आता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या भेटीवर देशमुख यांनी बाेलण्यास नकार दिला.

हेही वाचा : आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉंबनंतर शिवसेनेने भाजपला ‘हे’ दिले आव्हान...

चहा घेताना चर्चा तर होणारच...

यासंदर्भात आमदार बंटी भांगडिया यांना विचारणा केली असता, गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये वसंता देशमुख यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे देशमुखांच्या घरी गेलो होतो. स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली का, असे विचारले असता, त्यांच्यासोबत चहा घेतला आणि चहा पिताना चर्चा तर होणारच, असे उत्तर देत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली, असे आमदार भांगडिया म्हणाले. पण विषय स्थायी समिती सभापती निवडणुकीचाच होता, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख