वडेट्टीवरांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र खोटे!... वडेट्टीवार म्हणतात तो तर ब्लॅकमेलर!!

निवडणूक प्रतिज्ञापत्रात वडेट्टीवार यांनी शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून एक लाख 50 हजार रुपये स्वतःच्या आणि तीन कोटी 94 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज घेतल्याचे दाखविले आहे. मात्र ही कंपनी जुलै 2018 लाच बंद पडली आहे.
Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar

नागपूर : राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीतून सुमारे चार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केल्याचे दर्शविले. तसेच इतर कंपन्यांमध्ये केलेली कोट्यवधींची गुंतवणूक त्यांनी लपवून निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, असा आरोप संबंधित कंपनीचे संचालक दीपक मेहता यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. 

निवडणूक प्रतिज्ञापत्रात वडेट्टीवार यांनी शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून एक लाख 50 हजार रुपये स्वतःच्या आणि तीन कोटी 94 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज घेतल्याचे दाखविले आहे. मात्र ही कंपनी जुलै 2018 लाच बंद पडली आहे. दुसरीकडे पार्टनरशिप फर्म देवयानी लॉजिस्टिक याचा वडेट्टीवार यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला नाही. वरधान हॉस्पिटल नावाच्या कंपनीत त्यांनी एक कोटी 84 लाख 85 हजार रुपये गुंतवलेले आहे. पत्नीच्या नावाने 68 लाख गुंतवलेले असून त्याचाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला नाही. याची पोलीसांत तक्रार केली असल्याचे मेहता यांनी सांगितले. 

माझ्या तक्रारीवर वडेट्टीवार यांनी खुलासेवजा क्‍लिप माध्यमांना दिली. त्यात त्यांनी आपणास ब्लॅकमेलर म्हटले आहे. याविरोधात आपण मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. निवडणूक प्रतिज्ञापत्र आयकर विभागमार्फ तपासले जात असल्याने याची तक्रारसुद्धा आयकर विभागाकडे केली आहे. पोलिसांनी कार्यवाही केली नाही तर न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा दीपक मेहता यांनी दिला आहे. 

मेहता ब्लॅकमेलर : वडेट्टीवार 
दीपक मेहता मला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांना खोटी माहिती दिली असे वाटत असेल तर निवडणूक याचिका दाखल करावी. आपण त्यावर न्यायालयात उत्तर देऊ. मात्र आठ दिवसांपूर्वी तक्रारीची प्रत त्यांनी आपणास पाठविली तसेच प्रसिद्धी माध्यमांनाही पुरविली. यावरून त्यांचा हेतू काय आहे, हे स्पष्ट होते. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांचे कोणाशी संबंध आहेत? याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com