मंत्री विजय वडेट्टीवारांनी पाळला शब्द, ‘तौक्ते’ चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत मंजूर...

भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने ४ दिवसीय कोकण दौरा केला.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये १६ व १७ मे २०२१ रोजी ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्या पुढाकाराने ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदतीचे वाटप करण्यासाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. 170 crore 72 lakh 73 thousand has been sanctioned अशाप्रकारे वादळग्रस्तांना भरीव मदत करून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती  केली आहे. 

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले.  कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला तौक्ते चक्रीवादळाचा प्रचंड प्रमाणात तडाखा बसून शेती आणि फळबागांचे नुकसान झाले. या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने ४ दिवसीय कोकण दौरा केला. कोकण दौऱ्यात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना वडेट्टीवार यांनी  वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून वादळग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे  बहुवार्षिक पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णतः नष्ट किंवा अंशतः पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरे, मत्स्य बोटी व जाळ्यासाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार व टपरीधारक यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुद्येय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. 

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदतीचे  वाटप करण्यासाठी नागपूर विभागासाठी ४४ लाख २६ हजार, अमरावती विभागासाठी ३ कोटी ५७ लाख ३७ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९० हजार, नाशिक विभागासाठी १० कोटी ९७ लाख ६७ हजार, पुणे विभागासाठी ३ कोटी २४ लाख २५ हजार, कोकण विभागासाठी १५२ कोटी ४८ लाख २८ हजार, याप्रमाणे एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी मंजूर झाला आहे. कोकण दौऱ्यावर असताना दिलेला शब्द वडेट्टीवार यांनी शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण केला आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com