मंत्री विजय वडेट्टीवारांनी ‘त्यांना’ दिलेलं वचन पूर्ण केलं…

लगतच्या दोन जिल्ह्यांत पूर्वीपासून दारूबंदी आहे. मात्र, तिथे समीक्षा झाली नाही. केवळ चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यात आली, हा अन्याय आहे. गोरगरीब जनतेचा कोणताही विचार न करता केवळ दारूवाल्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अर्थकारणासाठी मांडलेला हा राजकीय डाव आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar यांनी आपले वजन वापरून अखेरीस चंद्रपूर जिल्ह्यातील Chandrapur district दारूबंदी उठवलीच. हे काम करून त्यांनी दारूवाल्यांच्या लॉबीला दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांमधील अशाच गुणांमुळे आज कॉंग्रेस देशात कुठेही डोके वर काढण्याच्या स्थितीत नाही, Today, the Congress is not in a position to raise its head anywhere in the country अशी टिका विश्‍वंभर चौधरी Vishwambhar Choudhari यांनी केली. 

चौधरी म्हणाले, डॉ. अभय बंग, पारोमिता गोस्वामी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष लढा देऊन जे कमावलं होतं, ते वडेट्टीवारांनी एका कागदाच्या फटक्यात नेस्तनाबूत केलं. मत मागायला लोकांकडे जायचे आणि नोकरी वेगळ्याच लॉबीची करायची, असे या नेत्यांचे काम आहे. कॉंग्रेस लोकांच्या मनातून का उतरली त्याचं एक हे एक मुख्य कारण आहे. अहो वडेट्टीवार, पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीचा मुहूर्त तरी टाळायचा होतात. तुम्हाला पंडित नेहरू कोण होते ते माहिती आहे ना, असा प्रश्‍नही विश्वंभर चौधरी यांनी केला आहे.

प्रशासनाची दारू तस्करांना होती साथ : पारोमीता गोस्वामी
आज दारूबंदीला सहा वर्षे झाली. पण, प्रशासनाने दारूबंदी यशस्वी व्हावी, यासाठी प्रयत्न केले नाहीत. उलट, तस्करांना साथ देण्यात आली. केवळ दारूवाल्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी एका मंत्र्याने अख्या राज्य मंत्रिमंडळास वेठीस धरून दारूबंदी उठविण्यास भाग पाडले, ही खेदाची बाब आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्यासाठी वैद्यकीय उपाययोजना, १०० टक्के लसीकरण होण्याऐवजी ‘दारूचा डोस’ देण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय झाला, हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया दारूबंदीच्या प्रणेत्या ॲड. पारोमिता गोस्वामी यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील महिलादेखील याच दारूमुळे त्रस्त होत्या. अनेक महिला विधवा झाल्या. अनेक मातांनी मुलांना गमावलं. कुटुंबाची वाताहत झाली. दारूतून मुक्त होण्यासाठीच दारूबंदीची मागणी महिलांनी रेटून धरली. दारूबंदीची समीक्षा करताना बंदीची मागणी करणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूबंदी अभियानाच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यात आल्या नाहीत. पीडित महिलांचे प्रश्न, त्यांच्या वेदनांची विचारपूस झाली नाही. समीक्षा करतानाही केवळ राजकीय हित साधण्यासाठी सोयीचा अहवाल तयार करण्यात आला. लगतच्या दोन जिल्ह्यांत पूर्वीपासून दारूबंदी आहे. मात्र, तिथे समीक्षा झाली नाही. केवळ चंद्रपूरची दारूबंदी उठविण्यात आली, हा अन्याय आहे. गोरगरीब जनतेचा कोणताही विचार न करता केवळ दारूवाल्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अर्थकारणासाठी मांडलेला हा राजकीय डाव आहे, अशा शब्दांत पारोमिता गोस्वामी यांनी टीकेची झोड उठवली आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com