शासकीय बैठकांच्या नावावर कॉंग्रेसचे मेळावे घेत आहेत मंत्री सुनील केदार…

कामठी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व कॉंग्रेसचे महासचिव सुनील भोयर यांनी आपल्यासोबत असभ्य भाषेत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केला.
Tekchand Sawarkar - Sunil Kedar
Tekchand Sawarkar - Sunil Kedar

नागपूर : कामठी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार State sport and animal hunbandary minister Sunil Kedar व कॉंग्रेसचे महासचिव सुनील भोयर Sunil Bhoyar यांनी आपल्यासोबत असभ्य भाषेत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप कामठीचे आमदार टेकचंद सावरकर Kamptee's MLA Tekchand Sawarkar यांनी केला. सोबतच शासकीय बैठकांच्या नावावर मंत्री केदार कॉंग्रेसचे मेळावे घेत असल्याची तोफही त्यांनी डागली. 

आज पत्रकार परिषदेत आमदार सावरकर म्हणाले, तालुका शासकीय कामांचा आढावा घेण्याकरिता शासकीय आढावा बैठकीचे आयोजन कामठी येथे करण्यात आले होते. सदर बैठकीला आमदार या नात्याने मी गेलो होतो. तहसीलदारांनी १२ जूनला पाठवलेल्या निमंत्रण पत्रानुसार बैठकीत मतदारसंघाचे प्रश्‍न मांडण्यासाठी गेलो होतो. परंतु बैठकीमध्ये शिष्टाचारानुसार व्यासपीठावर खुर्ची देण्यात आली नाही.  कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनंतर ८ व्या क्रमांकावर खुर्ची दिली होती. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि सदस्यांनाही व्यासपीठावर जागा सध्या देण्यात आली नव्हती. दोन विषय झाल्यानंतर तहसीलदार आमदार सावरकर यांच्या स्वागताकरिता आले. पण आमदारांनी कोविड नियमाअंतर्गत स्वागत नाकारले आणि मंत्री केदार यांना विकासाच्या विषयांवर बोलण्याकरिता परवानगी मागितली. त्यावर आता तुम्हाला बोलता येणार नाही, असे केदार म्हणाले. त्यानंतर आमदार सावरकर यांनी मुख्य माईककडे जाण्यास सुरुवात करताच कॉंग्रेसचे कार्यकर्ते शिवीगाळ करीत माझ्या अंगावर धावले. 

पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, अविनाश खडतकर, ईमेश्वर यावलकर, किशोर रेवतकर, अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, सुभाष गुजरकर, कैलाश बरबटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कपील आदमने उपस्थित होते. आमदार सावरकर यांनी मंत्री सुनील केदार यांना विचारणा केली की, ही बैठक शासकीय आहे की कॉंग्रेसचा मेळावा. यावर मंत्री केदार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. यापूर्वीही मौदा तालुक्यात पूर आला असताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व केदार पूर परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता आले असताना तहसील कार्यालयामध्ये आयोजित बैठकीतही सुनील केदार यांनी अपमान करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही त्यांना खडेबोल सुनावले होते व प्रत्युत्तर देत दादागिरी खपवून घेण्यात येणार नाही, असे सुनावले होते. त्यानंतर यांनी बैठकीचा जाहीर निषेध करीत बैठकीतून निघून गेलो होतो, असे आमदार सावरकर यांनी सांगितले. 

पुढे सावरकर म्हणाले की, मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य असून ५ लाख लोकांचे नेतृत्व करतो. त्यामुळे सुनील केदार हे जरी आपल्या दादागिरीकरिता प्रसिद्ध असले तरी त्यांची दादागिरी माझ्यावर चालू शकत नाही. काँग्रेस पक्षाचे लोक दादागिरीच करू शकतात कारण विकासासोबत त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच संवैधानीक पदावर असल्याने कॉंग्रेसच्या महासचिव सुरेश भोयर यांनी माझा केलेला अपमान हा माझा अपमान नसून मी नेतृत्व करणा-या ५ लाख लोकांचा अपमान आहे.

शासकीय आढावा बैठक घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतात. परंतु सुनील केदार यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे ते आपला सावनेर मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये आढावा बैठकी घेत फिरत असतात आणि गंभीर बाब म्हणजे बैठका घेताना पालकमंत्र्यांनासुध्दा विश्वासात घेत नाहीत. शासनाचा पैशांचा अपव्यय करून शासकीय बैठकीच्या नावावर काँग्रेसचे मेळावे घेत फिरत असतात. पशुसंवर्धन मंत्र्यांनी शेळ्या, मेंढ्या, दूध या विषयांवर मेळावे जरूर घ्यावे. परंतु आपल्या खात्याचे काम सोडून केदार शासकीय पैशाच्या भरवशावर काँग्रेसचे मेळावे घेऊन सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा घणाघाती आरोपही आमदार सावरकर यांनी केला आहे. 

शासकीय बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश भोयर व अवंतीका लेकुरवाळे, हे कोणतेही संवैधानीक पदावर नसताना कोणत्या नियमानुसार शासकीय बैठकीला व्यासपीठावर उपस्थित होते, यांचीसुध्दा सखोल चौकशी करून संबंधित बैठक आयोजीत करणा-या अधिका-यांवर कारवाई करावी. काँग्रेसचे महासचिव सुरेश भोयर यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणी पुराव्यानिशी तक्रार करणार असून त्यांचेवर गुन्हा दाखल करू आणि मंत्री केदार यांचेवर विधानसभा सभागृहामध्ये हक्कभंग आणणार असल्याचेही आमदार सावरकर म्हणाले.  
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in