राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला पेरणीचा शुभारंभ - minister of state bacchu kadu inagurated the sowing | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला पेरणीचा शुभारंभ

अरुण जोशी
सोमवार, 14 जून 2021

सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणे देखील उपलब्ध होतील की नाही, अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथिल झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला.

कुरळपुर्णा (जि. अमरावती) : मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. the monsoon arrived in the district  त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मुळचे शेतकरीच असलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू Minister of state Bacchu Kadu यांनी देखील काल विधिवत पेरणीचा शुभारंभ केला. Inagurated the sowing 

बच्चूभाऊ कडू व त्यांच्या पत्नी प्रा.डॉ. नयना कडू यांनी विधिवत बैल तिफन पूजन करून पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात केली. कोरोनामुळे आधीच सगळे संकटात सापडले आहेत. अशातच सततच्या लॉकडाऊनमुळे खते, बियाणे देखील उपलब्ध होतील की नाही, अशी शंका असतानाच लॉकडाऊन शिथिल झाले आणि शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी उत्साह संचारला. मात्र स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूदेखील आपल्यासोबत शेतात पेरणी करणार, हे बघून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. यावेळी प्रहारचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भोंगाडे, राहुल म्हाला, संदीप मोहोड, गौरव बोंडे, सतीश मोहोड, मनिष मोहोड, उमेश कपाडे, गोलू ठाकूर आदी उपस्थित होते.

दहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार 
कोरोनामुळे दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता या दोन्ही इयत्तांचे निकाल कधी आणि कशा पद्धतीने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर निकालासंदर्भात शिक्षण विभागाकडून तज्ज्ञांची एक कमिटी नेमण्यात येणार आहे. या संदर्भात मागणी करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिली.

हेही वाचा : नाना, जरा दमानं...!  वंचित बहुजन आघाडीने दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सल्ला...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांचे निकाल कशा पद्धतीने लावले जाणार आणि कधीपर्यंत जाहीर केले जातील, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत वेळेत निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून मंत्री बच्चू कडू यांनी तज्ज्ञांची कमिटी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निकालाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख