चक्क राज्यमंत्री बच्चू कडुंनीच बॅंक व्यवस्थापकाला दिली लाच...

स्वस्त धान्य दुकानांची त्यांनी पाहणी केली तर बँकेतही फेरफटका मारला. विशेष म्हणजे, त्यांनी गुटखा विक्रेत्यांवर धाड टाकून त्यांचा माल जप्त करीत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
Sarkarnaa Banner
Sarkarnaa Banner

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू Guardian Minister Bacchu Kadu हे अनोख्या आंदोलनांसाठी ओळखले जातात. राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय आज अकोला जिल्ह्यातील Akola District नागरिकांना आला. वेशांतर करून पालकमंत्र्यांनी अकोला शहर व पातूर येथील विविध शासकीय कार्यालयांची झाडाझडती घेतली. विदर्भ कोंकण बँकेत जाऊन कर्ज मिळविण्यासाठी त्यांनी व्यवस्थापकांना लाच देऊ केली, पण व्यवस्थापकांनी त्यांना रितसर अर्ज करण्यास सांगितले. But manager told him to apply application. 

स्वस्त धान्य दुकानांची त्यांनी पाहणी केली तर बँकेतही फेरफटका मारला. विशेष म्हणजे, त्यांनी गुटखा विक्रेत्यांवर धाड टाकून त्यांचा माल जप्त करीत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. अकोला जिल्ह्यातील कारभाराचा जवळून अनुभव घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज कोणताही शासकीय दौरा जाहीर न करता जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. शासकीय यंत्रणा, बँका कशा काम करतात, नागरिकांना त्याचा कोणता त्रास होते, हे जवळून अनुभवण्याच्या उद्देशाने त्यांनी वेशांतर करीत कोणताही ताफा सोबत न घेता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अकोला व पातूर या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांनी महानगरपालिकेपासून सुरुवात केली. महानगरपालिकेत झाडाझडती घेतल्यानंतर अकोल्यातील एका दुकानावरून गुटखा विकत घेतला. त्यानंतर त्यांचा मोर्चा पातूर येथे पोहोचला. तेथे त्यांनी विदर्भ कोंकण बँकेत जाऊन कर्जाबाबत अर्ज भरून घेण्यास सांगितले. तातडीने अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना पैसेही देवू केले. मात्र, बँकेच्या व्यवस्थापकांनी प्रामाणीकपणे रितसर अर्ज करण्यास सांगितले. 

पातूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांचा ताफा पोहोचला. तेथे त्यांनी तातडीने राशन कार्ड बनविण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी रितसर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांची त्यांनी पाहणी केली. मात्र, तेथेही त्यांना प्रामाणीपणाचा प्रत्यय आला. ऑनलाइन वितरण असल्याने कुणालाही धान्य देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रावर जाऊन बियाणे वितरणाची व्यवस्था त्यांनी बघितली. त्यानंतर त्यांनी पातूर येथील एका किराणा दुकानात धाड टाकून तेथे गुटखा जप्त केला. पोलिसांना बोलावून रितसर कारवाई करीत स्वतः बसून विक्रेत्यावर गुन्हा दाखल करवून घेतला. 

पोलिस, अन्न औषध प्रशासनावर हप्तेखोरीचा आरोप
पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे करणारे, गुटखा विक्रेता यांची झाडाझडती घेतली. त्यात विक्रेत्यांनी अन्न औषध प्रशासन व पोलिसांना हप्ते पुरविले जात असल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. दोन्ही विभागांवर गुटखा विक्रीला प्रतिबंध करण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून हप्ते खाण्याचे काम सुरू असल्याने कारवाई होत नसल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. 

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, पुरवठा विभाग, स्वस्त धान्य दुकाने, कृषी सेवा केंद्र, बँकेत वेशांतर करून पाहणी केली. काही ठिकाणी प्रामाणिकपणे काम सुरू असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी अवैध मार्गाने कामे सुरू असल्याचे दिसून आले. अन्न व औषध प्रशासन, पोलिस हप्तेखोरीत लिप्त झाले आहेत. त्यांच्यावर कोणताही अंकुष राहिला नाही. याबाबत दोन्ही विभागांच्या प्रमुखांना जाब विचारणार आहे. 
- बच्चू कडू, पालकमंत्री, अकोला. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com