देवदर्शनातून मंत्री राठोडांनी आज केला छबी सुधारण्याचा प्रयत्न… - minister rathore tries to improve image through devdarshan | Politics Marathi News - Sarkarnama

देवदर्शनातून मंत्री राठोडांनी आज केला छबी सुधारण्याचा प्रयत्न…

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राठोड यांनी एकाच दिवसात तीन ठिकाणी देवदर्शन घेतल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : राज्याचे वनमंत्री संजय राठोड पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांच्या रडारवर आहेत. गेले १५ दिवस गायब राहिल्यानंतर आज पोहरादेवीत ते प्रगटले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राठोड आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणात बिघडलेली छवी सुधारण्यासाठी राठोडांनी आज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि त्यानंतर मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यांत देवदर्शनाचा सपाटा लावला.

संजय राठोड यांनी सर्वप्रथम पोहरादेवी येथे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर नेर तालुक्यातील मानकी आंबा येथे सपत्नीक उद्धवबाबांचे दर्शन घेतले. पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर ज्या पद्धतीने समाज माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर संजय राठोड यांच्या प्रतिमेला समाजात धक्का बसल्याचे बोलले जात होते. म्हणूनच कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राठोड यांनी एकाच दिवसात तीन ठिकाणी देवदर्शन घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय त्यांनी सपत्नीक ज्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्या तीर्थक्षेत्राचे भाविक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे देवदर्शनाच्या माध्यमातून ते अनेक भाविकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, हा येणारा काळच ठरवणार आहे.

हे सुद्धा वाचा :- राठोड अडचणीत...पोहरादेवी येथील शक्तिप्रदर्शन प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तत्काळ कारवाईचे आदेश

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख