मंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते करतात दादागीरी, आमदार सावरकर भडकले...

सुनील केदार दादागिरी करतात. आमदार या नात्याने सरकारी बैठकांना बोलावणे आपणास प्रोटोकॉलनुसार आवश्यक आहे. सरकारी बैठका पक्षाच्या नसतात. मात्र त्यांना विरोधकांचा राग आहे. आमचे बोलणेही आवडत नाही.
Tekchand Sawarkar - Sunil Kedar
Tekchand Sawarkar - Sunil Kedar

नागपूर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार sport and animal hunbandary minister Sunil Kedar यांनी कामठी येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर MLA Tekchand Sawarkar यांची जिल्हा परिषद सभापतींच्या नंतर आठव्या क्रमांकावर ठेवण्यात आली. त्यावर कळस म्हणजे बोलूही देण्यात आले नाही. त्यामुळे आमदार सावरकर चांगलेच खवळले आणि निषेध नोंदवत बैठकीतून निघून गेले. मंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते नेहमीच दादागिरी करतात, minister kedar and his workers do dadagiri  असा आरोप आमदार सावरकर यांनी केला. 

मंत्री सुनील केदार मतदारसंघातील सरकारी बैठकांमध्ये आपल्याला बोलू देत नाही, बोलण्याचा प्रयत्न केल्यास अपमानास्पद वागणूक देतात. मागच्या वेळी मौदा येथेही एका बैठकीत त्यांनी असाच प्रकार केल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला. आता पुन्हा तोच कित्ता गिरवला गेल्याने आमदार टेकचंद सावरकर याच चांगलेच भडकले आहेत. आता आपण गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासोबत त्यांची चांगलीच बाचाबाची झाल्याचीही माहिती आहे. 

लॉकडाऊन संपल्यानंतर मंत्री केदार यांनी मौदा व कामठी तालुक्यातील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली होती. कामठी मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर आहेत. यावेळी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती तापेश्वर वैद्य, नेमावली माटे, उज्वला बोढारे, भारती पाटील, सरपंच, प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सावरकर यांच्यासाठी ८ व्या क्रमांकावर खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा पारा आधीच चढलेला होता. मंत्र्यांचे दोन विषय आटोपल्यावर सावरकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध नोंदवून ते बैठकीतून निघून गेले. यापूर्वीसुद्धा केदार यांनी घेतल्या बैठकीला सावरकरांना बोलावण्यातच आले नव्हते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून आपली नाराजी जाहीर केली होती. यावेळी बैठकीला बोलावले, मात्र पहिले जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. नंतर त्यांची खुर्ची ठेवली होती. त्यामुळे सावरकर आधीच भडकलेले होते आणि त्यातल्या त्यात बोलू न दिल्यामुळे त्यांचा संयम सुटला. 

सुनील केदार दादागिरी करतात. आमदार या नात्याने सरकारी बैठकांना बोलावणे आपणास प्रोटोकॉलनुसार आवश्यक आहे. सरकारी बैठका पक्षाच्या नसतात. मात्र त्यांना विरोधकांचा राग आहे. आमचे बोलणेही आवडत नाही. आमदार म्हणून आपण पहिल्यांदा निवडून आलो असलो तर जिल्हा परिषदेत आपण पाच वेळा निवडून आलो आहोत. यापुढे आपण शांत बसणार नाही. 
टेकचंद सावरकर, आमदार, कामठी विधानसभा.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com