मेडिकलमध्ये डॉक्‍टरांनी दारुड्यांना बदडले, कारवरच सुरू केला होता "ओपन बार' 

मेडिकलच्या इतर निवासी डॉक्‍टरांसह अधिकाऱ्यांना मद्यपार्टीची माहिती कळताच त्यांनी तेथे धाव घेतली. पकडण्यात आलेल्या मद्यपीला पकडून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणले. सुभाष पडोळे असे नाव मद्यपीने सांगितले. या व्यक्तीला अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.
daru
daru

नागपूर : जवळपास तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर दारुची दुकाने उघडली. त्यानंतर काही दिवसांनी वाईन बार उघडले, मात्र फक्त विक्री करण्याचीच परवानगी तेवढी मिळाली. त्यामुळे पिणाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले. पण हार मानतील ते तळीराम कसले? मग त्यांनी बंद दुकाने आणि खुल्या मैदानांवर "ओपन बार' सुरू केले. रविवारी मध्यरात्रीनंतर मेडिकलच्या मोकळ्या आवारात कारवर दारुच्या बाटल्या ठेवून ढोसणाऱ्यांना डॉक्‍टर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी चांगलेच बदडून काढले. 

मेडिकलच्या मोकळ्या आवारात काही बाहेरच्या व्यक्तींनी कार उभी केली. कारवर दारूच्या बाटल्या ठेवल्या आणि मद्यपार्टी सुरू केली. हा धक्कादायक प्रकार दिसताच यथील निवासी डॉक्‍टरांनी त्यांना रंगेहात पकडले. या झकापकीत सारे पळाले. मात्र, एकाला पकडण्यात त्या निवासी डॉक्‍टरांना यश आले. मद्यपीचे नाव सुभाष पडोळे आहे. मेडिकलच्या आवारातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दिशेने जाताना मोकळी जागा आहे. या जागेत काही व्यक्ती कारची दारे खुली ठेवून गाणी वाजवत होते. कारवर दारूची बॉटल होती. गाण्याचा त्रास होत असल्याने निवासी डॉक्‍टर संकेत वाढवकर, अर्पित धकाते व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. कोणीतरी येत असल्याने त्यांनी पार्टी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळात मेडिकलमधील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना सूचना मिळाली होती. तातडीने सर्वांनी मिळून या दारुड्यांना बदडले. इतर दोघे पसार झाले. यातील एकाला पकडण्यात यश आले. 

अजनी पोलिसांच्या स्वाधीन 
मेडिकलच्या इतर निवासी डॉक्‍टरांसह अधिकाऱ्यांना मद्यपार्टीची माहिती कळताच त्यांनी तेथे धाव घेतली. पकडण्यात आलेल्या मद्यपीला पकडून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणले. सुभाष पडोळे असे नाव मद्यपीने सांगितले. या व्यक्तीला अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले गेले. पोलिसांकडून कोणती कारवाई झाली, हे मात्र कळू शकले नाही.                  (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com