Sandip Joshi - Tukaram Mundhe
Sandip Joshi - Tukaram Mundhe

आयुक्तांच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांसाठी महापौर रस्त्यावर उतरणार 

दुकानदारांचीही स्थिती नाजूक आहे. ते एवढे पैसे कुठून आणतील. ५ लाख चाचण्या करण्यासाठी १९०० रुपये प्रती चाचणीप्रमाणे ९५ कोटींचा व्यवसाय होईल. आयुक्तांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण करू नये. आयुक्तांचा हा निर्णय अत्यंत तुघलकी आहे. व्यापाऱ्यांशी उत्तम संवादातूनही मार्ग निघू शकतो.

नागपूर : दुकान मालक किंवा दुकानातील कर्मचारी कोरोनाबाधित असल्यास दुकानांत येणाऱ्या ग्राहकांना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत करण्याचे निर्देश दिले. चाचण्या न केल्यास दुकाने सील करण्याचा इशाराही दिला. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांसाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. 

शहरातील सर्व व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांच्या घरात आहे. आता सहा दिवसांत ५० लाख चाचण्या कशा करणार? असा सवाल उपस्थित करीत आयुक्तांनी शहरातील वातावरण दूषित करू नये, असे आवाहनही महापौर जोशी यांनी केले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील व्यापाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत करा, अन्यथा दुकाने बंद करू, अशी धमकी दिली. यावर महापौर संदीप जोशी यांनी आयुक्तांना मनमानी निर्णयासाठी धारेवर धरले. शहरात ५० हजार व्यापारी असून प्रत्येकाकडे सरासरी १० कर्मचारी आहेत. अर्थात १८ ऑगस्टपर्यंत ५ लाख चाचण्या कराव्या लागतील. हे शक्य आहे काय? आयुक्तांचा निर्णय अव्यवहारिक नव्हे तर व्यापाऱ्यांसोबतच तुटपुंज्या पगारात घर चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरणारा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांची चाचणी दुकानदाराने करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. 

दुकानदारांचीही स्थिती नाजूक आहे. ते एवढे पैसे कुठून आणतील. ५ लाख चाचण्या करण्यासाठी १९०० रुपये प्रती चाचणीप्रमाणे ९५ कोटींचा व्यवसाय होईल. आयुक्तांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण करू नये. आयुक्तांचा हा निर्णय अत्यंत तुघलकी आहे. व्यापाऱ्यांशी उत्तम संवादातूनही मार्ग निघू शकतो. व्यापाऱ्यांकडील एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास संपर्कातील इतरांचीही चाचणी हे योग्य आहे. परंतु सरसकट सर्व व्यापाऱ्यांना धमकी देण्याचा निर्णय योग्य नाही. यात कुठलेही राजकारण न करता जनतेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.    (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com