स्मार्ट सिटीच्या बैठकीत मुंढेंना घेरण्यासाठी महापौर आखताहेत रणनिती 

नियमानुसार संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय सीईओपद बळकावून आयुक्तांनी नियमबाह्यरित्या अनेकांना नोकरीतून काढले, कंत्राटदाराला 20 कोटी दिल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाच्या येत्या बैठकीत इतर संचालकांनी कायद्याच्या बाजूने उभे राहावे, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली.
Sandip Joshi - Tukaram Mundhe
Sandip Joshi - Tukaram Mundhe

नागपूर : स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक येत्या शुक्रवारी होऊ घातली आहे. आज महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सर्व संचालकांना नोटीस पाठविली. संचालक मंडळाच्या बैठकीत कायद्याच्या बाजूने उभे राहावे, अन्यथा स्मार्ट सिटीतील अनियमितता तुमच्याही संगनमताने झाली, असे समजण्यात येईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. 

स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांविरोधात रणनिती आखण्यास सुरुवात केली. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट सिटी सीईओपदी आयुक्तांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे. आयुक्तांच्या संचालकपदाला विरोध नाही, असे महापौरांनी आधीच स्पष्ट केले. परंतु नियमानुसार संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय सीईओपद बळकावून आयुक्तांनी नियमबाह्यरित्या अनेकांना नोकरीतून काढले, कंत्राटदाराला 20 कोटी दिल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर संचालक मंडळाच्या येत्या बैठकीत इतर संचालकांनी कायद्याच्या बाजूने उभे राहावे, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली. 

इतर संचालकांना याबाबत नोटीस पाठविल्याचे त्यांनी नमुद केले. संचालक मंडळात 14 सदस्य असून सहा महापालिकेतील पदाधिकारी आहेत. यात महापौर संदीप जोशी, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, सेनेच्या नगरसेविका मंगला गवरे, बसपाच्या नगरसेविका वैशाली नारनवरे यांचा समावेश आहे. याशिवाय स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण परदेसी, आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नासुप्र सभापती शीतल उगले, सीए अनिरुद्ध शेनवाई, सीए जयदीप शाह हेही संचालक आहेत. पिंटू झलके व आयुक्त मुंढे यांच्या संचालकपदाला येत्या शुक्रवारी मंजुरी मिळण्याची प्रक्रिया होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com