नागपूर जिल्ह्यात पाच जागांवर महाविकास आघाडी समर्थित पॅनलचा झेंडा - mahavikas alliance supported panels flag on five grampanchayat in nagpur district | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर जिल्ह्यात पाच जागांवर महाविकास आघाडी समर्थित पॅनलचा झेंडा

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

पारशिवनी तालुक्यातील बाभुळवाडा, हिंगणा तालुक्यातील किन्ही धानोली, नरखेडमधील खैरगाव आणि अंबाडा सायवाडा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे.

नागपूर : जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले आहे. आज या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. आतापर्यंत सहा ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून यामध्ये सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडी समर्थित पॅनल विजयी झाले आहेत, तर फक्त एका जागेवर भाजपचे पॅनल विजयी झाले आहे.
  
काटोल तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून त्यामध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनल पॅनल विजयी झाले आहे. तसेच पारशिवनी तालुक्यातील बाभुळवाडा, हिंगणा तालुक्यातील किन्ही धानोली, नरखेडमधील खैरगाव आणि अंबाडा सायवाडा ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. तसेच हिंगणा तालुक्यातील दाभा ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे पॅनल विजयी झाले आहे.
 

नागपूर जिल्ह्यात नरखेड, सावनेर, कळमेश्वर या तालुक्यांतील एकूण चार ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर गेल्या १५ जानेवारीला १२७ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. जिल्हात एकूण ७२ टक्के मतदान झाले असून आज गावगाड्याचे कारभारी ठरणार आहेत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख