असंवेदनशील व टोलवाटोलवी करणारे सरकार म्हणत फडणवीसांची सडकून टिका

गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना शिवसेना गुजराती समाजाला जवळ करीत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, त्याचवेळी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध म्हणजे ही शिवसेनेची नौटंकी आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.
Fadanvis on Bhandara
Fadanvis on Bhandara

लोणावळा : भंडारा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्याची मागणी सहा महिन्यांपूर्वी करूनही ती महाविकास आघाडी सरकारने बसवली नाही. दुसरीकडे बिल्डरांसाठी, मात्र ते धावाधाव करतात. त्यामुळे हे असंवेदनशील व टोलवाटोलवी करणारे सरकार आहे, अशी तोफ माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लोणावळा येथे डागली.

मुख्यमंत्र्यांनी भेट देऊनही दहा निष्पाप कोवळे जीव घेणाऱ्या भंडारा येथील जळीतकांडप्रकरणी कोणावरही अद्याप कारवाई झालेली नाही वा सबंधित कुटुंबांना मदतही मिळाली नसल्याची घटना, हे सरकार असंवेदनील असल्याला दुजोरा देत आहे, असे फडणवीस म्हणाले. भंडारा आगीत काहींनी आपली जबाबदारी पार पाडली नसल्याने त्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातून शेतकरी निघून गेले असून ते सध्या डावे लोक चालवित आहेत, असा दावाही एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केला. महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथू गोडसेचे कोणी समर्थन करू शकत नाही. जर कोणी ते करत असेल, तर ते चूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना शिवसेना गुजराती समाजाला जवळ करीत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, त्याचवेळी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध म्हणजे ही शिवसेनेची नौटंकी आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजप प्रदेश महिला मोर्चा कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपानंतर ते मिडियाशी बोलत होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, खासदार रक्षा खडसे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, अश्विनी जिचकार, विद्या ठाकूर, स्मिता वाघ, माधवी नाईक, निता केळकर, प्रणिता चिखलीकर, दीपाली मोकाशी, कांता नलावडे, सविता कुलकर्णी, सायली बोत्रे आदींसह राज्यभरातील महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com