"लुटेरी दुल्हन' भंडारा पोलिसांच्या अटकेत, तर पार्टनर गुन्हे शाखेच्या जाळ्यात 

सुनीलने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयाणात प्रीती दास, मंगेश आणि सतीशचे नाव सांगितले होते. मात्र, प्रीतीचे लकडगंजमधील एका पोलिस अधिकाऱ्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास तब्बल सहा महिने उलटावे लागले.
Preeti Das
Preeti Das

नागपूर : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रीती दासने दोघांची 25 लाख रुपयांनी फसवणूक केली होती. प्रीतीच्या टोळीतील आणखी चार जण त्या प्रकरणात होते. त्यांपैकी एक मोठ्या पक्षाचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. लकडगंजमधील प्रकरणात प्रीतीचा एक पार्टनर सतीश सोनकुसरेला गुन्हे शाखेने अटक केली आहे, तर प्रीतीला भंडारा पोलीसांनी अटक केली. या प्रकरणातील अन्य एक आरोपी मंगेश पौनिकर फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज भागात राहणारे मेस संचालक सुनील पौनिकर यांना सतीश सोनकुसरे याने सहा लाख रुपये व्याजाने दिले. व्यवसाय बुडाल्याने सुनील हे सतीश याला पैसे परत करू शकले नाहीत. त्यामुळे सतीश आणि सुनील यांच्यात वाद होता. याचदरम्यान सतीश याची प्रितीसोबत ओळख झाली. पाचपावली व लकडगंजमधील पोलिसांसोबत ओळख असल्याचे सांगून प्रितीने सतीश याला पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रिती ही पोलिसांना घेऊन सुनील यांच्या घरी गेली. यावेळी सतीश व मंगेशही प्रीतीच्या सोबत होते. प्रीतीने सुनील यांच्या पत्नीला "धंद्यावर बसवून' पैसे वसूल करण्याची धमकी दिली. याचा मानसिक धक्का सुनील यांना बसला. 27 नोव्हेंबर 2019 ला सुनील यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

प्रीती, सतीश व त्यांच्या साथीदारांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे सुनील यांनी मृत्यूपूर्वी बयाणात सांगितले होते. एक महिन्यांपूर्वी लकडगंज पोलिसांनी प्रीती व तिच्या साथीदारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रीतीविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले. प्रीतीविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी तीन प्रकरणांमध्ये प्रीतीला अटक केली. लकडगंजमधील दाखल गुन्ह्यात प्रीतीला जामीन मिळाला असला तरी तिचा साथीदार सतीश याला जामीन मिळाला नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. 

पत्नीला धंद्यावर बसवून पैसे वसुल करण्याची धमकी प्रीती दासने दिल्यामुळे पती सुनीलने आत्महत्या केली. सुनीलने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयाणात प्रीती दास, मंगेश आणि सतीशचे नाव सांगितले होते. मात्र, प्रीतीचे लकडगंजमधील एका पोलिस अधिकाऱ्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास तब्बल सहा महिने उलटावे लागले. थेट पोलिस आयुक्‍तांना दखल घ्यावी लागली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीलने लिहिलेली सुसाईड नोटही लकडगंज पोलिसांनी बदलवली, अशीही चर्चाही मध्यंतरी होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com