एलएनजीमुळे इंधन खर्चात दरवर्षी प्रतिवाहन ११ लाखांची बचत होईल...

स्टेशनसाठी लागणारी यंत्रणा देशातच विकसित करण्यात आली आहे. डिझेलचे दर ९५ रुपयांच्या घरात असताना एलएनजी केवळ ६० रुपये दरात उपलब्ध आहे. एलएनजीमुळे २० ते ५० टक्केपर्यंत मायलेज वाढणार आहे. विशिष्ट किट लावून सामान्य ट्रक किंवा बसेस एलएनजीवर चालविली जाऊ शकतात.
एलएनजीमुळे इंधन खर्चात दरवर्षी प्रतिवाहन ११ लाखांची बचत होईल...
Nitin Gadkari

नागपूर : पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. खासगी वाहन मालक आणि वाहतूकदारांना हे दर परवडेनासे झाले आहेत. त्याला एलएलजी (लिक्विफाईड नॅचरल गॅस) हा उत्तम पर्याय आहे. एलएनजीमुळे इंधन खर्चात दरवर्षी प्रतिवाहन ११ लाख रुपयांची बचत होणार आहे, lng will save rs 11 lakh per annum per vehicle on fule cost  असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari म्हणाले. 

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलने सुरू आहेत. परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारे प्रदूषणमुक्त एलएनजी  भविष्यातील इंधन ठरणार असून त्यामुळे परिवहन क्षेत्रात क्रांती घडेल,असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या डिझेलमुक्त विदर्भ संकल्पनेंतर्गत बैद्यनाथ समूहातर्फे आउटर रिंग रोडवरील पांढूर्णा शिवारात देशातील पहिल्या बी-एलएनजी स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. या प्रसंगी बैद्यनाथचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, बी-एलएनजीचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव शर्मा, ट्रान्सपोर्ट व्यवसायी प्यारे खान, व्ही. सुब्बाराव उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले की, क्रूड ऑईलचे आयातीवर दरवर्षी ८ लाख कोटींचे विदेशी चलन खर्च होते. शिवाय पेट्रोल व डिझेलमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही होते. शेतातील बायोमासपासूनही इथेनॉल निर्मिती संदर्भात ३ महिन्यांमध्ये निर्णय घेतला जाईल. बायो इथेनॉलमुळे कृषी क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. पुढच्या टप्प्यात बायो एलएनजी निर्मितीसह ग्रीन हायड्रोजनवर वाहने चालविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रणव शर्मा यांनी डिझेल आधारित अर्थव्यवस्थेला गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे वळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगतानाच लवकरच अन्य भागांमध्येही असे स्टेशन सुरू करणार असल्याचे सांगितले. सुरेश शर्मा यांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या. 

ट्रान्सपोर्ट क्षेत्राला बूस्ट 
स्टेशनसाठी लागणारी यंत्रणा देशातच विकसित करण्यात आली आहे. डिझेलचे दर ९५ रुपयांच्या घरात असताना एलएनजी केवळ ६० रुपये दरात उपलब्ध आहे. एलएनजीमुळे २० ते ५० टक्केपर्यंत मायलेज वाढणार आहे. विशिष्ट किट लावून सामान्य ट्रक किंवा बसेस एलएनजीवर चालविली जाऊ शकतात. किट लावण्याची व्यवस्थाही बी-एलएनजी स्टेशनवर उपलब्ध आहे. त्यासाठी जवळपास १० लाखांचा खर्च येणार आहे.

हेही वाचा : 

७ ते ९ महिन्यात तो भरून निघेल. त्यानंतर दरवर्षी प्रतिवाहन ११ लाखांची इंधन खर्चात बचत होणार आहे. यामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्राला बूस्ट मिळेल. सध्या उपलब्ध किट मोठ्या वाहनांमध्येच लावण्याची व्यवस्था असली तरी येणाऱ्या दिवसांमध्ये वाहन कंपन्याही एलएनजीवर चालणारी वाहने बाजारात आणतील. स्पर्धा वाढल्यास एलएनजीचे दरही कमी होतील.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in