महाराष्ट्रातील पहिली महिला फायटर पायलट म्हणते, आपल्या मनाचे ऐका !

जगात काहीही अशक्‍य नाही. आत्मविश्‍वास महत्त्वाचा असल्याचे अंतरा मेहता हिने सांगितले. आज देशातील दहावी महिला फायटर पायलट झाल्याचा मनातून आनंद आहे. मात्र, तो आनंद मिळविण्यासाठी मनात जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी केली. मुलीही मुलांप्रमाणे फायटर पायलट होऊ शकतात, हे सिद्ध केले. यासाठी घरच्यांनीही मदत केली. सुरुवातीला शक्‍य होईल का, असे वाटले; मात्र प्रशिक्षणामुळे आत्मविश्‍वास वाढल्याचे अंतरा म्हणाली.
antra mehta
antra mehta

नागपूर : "मंजिले उन्ही को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती हैं, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं' या ओळींना सार्थ ठरवत नागपूरच्या फ्लाइंग ऑफिसर अंतरा रवी मेहता हिने राज्यातील पहिली आणि देशातील दहावी महिला फायटर पायलट होण्याचा मान पटकाविला आहे. गेल्या शनिवारी भारतीय वासुसेनेची पासिंग आउट परेड झाली. तिच्या गगनभरारीने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कुठलेही काम करताना ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचे ऐका. जगात काहीही अशक्‍य नाही. आत्मविश्‍वास महत्त्वाचा असल्याचे अंतरा मेहता म्हणते. 

क्षणात विध्वंस करून परकीय शत्रूला थरकाप सोडणारी लढाऊ विमानांची देशाच्या सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. "सर्जिकल स्ट्राइक'च्या वेळीही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. मात्र, महिलांना फायटर पायलट होता येत नव्हते. त्यामुळे न्यायालयीन लढाई जिंकून 2016 साली अवनी चतुर्वेदी हिने देशातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा मान मिळवला. हेच स्वप्न उराशी बाळगून नागपूरच्या अंतरा मेहता हिने फायटर पायलट होण्यासाठी परिश्रम घेतले. राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असलेल्या अंतराने त्यासाठी 2018 मध्ये रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. 

यानंतर तिची हैदराबादजवळील डुंडीगल येथील एअर फोर्स अकादमीत निवड झाली. वर्षभर प्रशिक्षण घेतल्यावर अंतराने "पिलेटस पीसी-7' हे विमान यशस्वीरीत्या उडविले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात तिने "किरण एमके-1' हे विमान यशस्वीरीत्या उडवले. शनिवारी पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये तिच्यासह 123 प्रशिक्षणार्थींना एअर फोर्स सेवेत सामावून घेण्यात आले. आता तिला बिदर (कर्नाटक) येथे "हॉक्‍स' या विमानावरील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर कलाईकोंडा (पश्‍चिम बंगाल) येथे विशेष प्रशिक्षण होईल. अंतराचे वडील रवी मेहता एका सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत असून, आई पाळणाघर चालविते. घरात लहान असलेल्या अंतराची मोठी बहीण दीपशिखा ही खासगी शिकवणीवर्गात कॉम्प्युटर सायन्स हा विषय शिकविते. अंतराच्या स्वप्नपूर्तीत वडील रवी यांचे परिश्रम आणि बहीण दीपशिखा यांचे मोठे योगदान आहे. 

कुठलेही काम करताना ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचे ऐका. जगात काहीही अशक्‍य नाही. आत्मविश्‍वास महत्त्वाचा असल्याचे अंतरा मेहता हिने सांगितले. आज देशातील दहावी महिला फायटर पायलट झाल्याचा मनातून आनंद आहे. मात्र, तो आनंद मिळविण्यासाठी मनात जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी केली. मुलीही मुलांप्रमाणे फायटर पायलट होऊ शकतात, हे सिद्ध केले. यासाठी घरच्यांनीही मदत केली. सुरुवातीला शक्‍य होईल का, असे वाटले; मात्र प्रशिक्षणामुळे आत्मविश्‍वास वाढल्याचे अंतरा म्हणाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com