उपराजधानीत बिबट्याची दहशत, सहा दिवसांपासून वनविभागाला देतोय हुलकावणी...  

गेल्या शुक्रवारपासून गायत्रीनगर, राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्था, परसोडी, आयटी पार्क, व्हीएनआयटी, पीकेव्ही विश्रामगृहानंतर थेट शहराच्या मध्यवर्ती भागातील महाराजबाग परिसरापर्यंतचा प्रवास करणारा बिबट्या अद्यापही वन विभागाला गवसलेला नाही.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : मागील आठवड्यात शुक्रवारी महाराजबाग परिसरात एक बिबट आढळला. A lepoard was found in Maharajbagh area जेवढे कुतूहल, तेवढीच दहशत नागरिकांमध्ये होती. वनविभागाने लागलीच दखल घेऊन बिबट्याचा शोध सुरू केला. The forest department immediately took notice and started searching for the leopard पण आज सहा दिवस उलटूनही बिबट सापडेला नाही. त्याला पकडण्यासाठी महाराजबाग परिसरात तीन पिंजरे लावण्यात आले. पण यांपैकी एकाही पिंजऱ्यात बिबट अडकला नाही. The lepoard was not trapped in any of the cages त्यामुळे आजही बिबट्याची दहशत कायम आहे. 

पिंजऱ्यात अडकली कुत्री
काल दुपारी वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याच्या परिसराच्या पाहणीसाठी आले, डुकराची शिकार केलेल्या ठिकाणावर ते बसले होते. तेवढ्यात ज्या पिंजऱ्यात बिबट्याचे भक्ष्य म्हणून बकरी ठेवली त्या पिंजऱ्याचे दार खाली पडल्याचे एका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. दार खाली आल्याने बिबट्या जेरबंद झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कर्मचारी सावध पवित्रा घेत पिंजऱ्याच्या दिशेने निघाले. पिंजऱ्याजवळ पोचल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला आणि एकच हंशा पिकला. कारण, त्या पिंजऱ्यात बिबट नव्हे तर दोन श्वान अडकली होती. 

बिबट शहराच्या मध्यवस्तीपर्यंत आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार चार पिंजरे विविध ठिकाणी लावण्यात आले होते. त्यातील एका पिंजऱ्याचे दार पडलेले असल्याचे दिसल्याने बिबट्या पकडला गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ते पिंजऱ्याच्या दिशेने निघाले. तेव्हा पिंजऱ्याच्या शेजारीही पलीकडच्या बाजूने पायांची हालचाल दिसत होती. त्यामुळे दबक्या पावलानं सुरक्षिततेची काळजी घेत पिंजऱ्याजवळ पोचले. मात्र, त्या पिंजऱ्यात कुत्रे बंदीस्त झाल्याचे दिसले. वन कर्मचाऱ्यांनी दार उघडताच कुत्र्यांनी मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. कुत्र्‍यांसह कर्मचाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला. दरम्यान, पिंजऱ्यात ठेवलेली बकरी कुत्र्यांच्या भीतीने जोराने ओरडत होती. कुत्रे पळताच तिचे ओरडणे बंद झाले. त्याचवेळी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी बकरीसाठी चारा आणि पाणी दिले. 

बिबट्याने मंगळवारी शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराजबाग जवळील नाल्यात डुकराची शिकार केली आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी महाराजबाग परिसरात तीन पिंजरे लावले असून त्यात बकऱ्या ठेवल्या आहेत. महाराजबागच्या मागील बाजूस असलेल्या तालूका कृषी अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात बिबट्याने डुक्कर मारुन अर्धवट खाल्ल्याची  माहिती महाराजबाग प्रशासनाला दिली. ती माहिती वन विभागाला देताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परिसरातील संपूर्ण तपासणी करण्यात आली. दरम्यान, बिबट्याने शिकार केलेलें अर्थवट खाल्लेले डुकर दिसले. 

बिबट नाल्याच्या साहाय्याने महाराजबाग परिसरात आला असावा, असे वन विभागाने  सांगितले. याच परिसरात पुन्हा बिबट्या डुकर खायला येऊ शकतो. यामुळे या परिसरात पिंजरे लावण्यात आलेले आहेत. डुकराची शिकार केली त्या परिसरात तीन बाजूने नाले एकत्र मिळतात. त्यामुळे तो कुठे गेला हे कळू शकले नाही. वन विभागाच्या चमूने डॉग स्कॉडच्या माध्यमतून बिबट्याचा मागोवा  घेण्याचा प्रयत्न केला. स्नायफर डॉग्जने ही बिबट्याचा संभाव्य मार्गाकडे इशारा केल्याने त्या दिशेने पकडण्याची व्यूहरचना आखण्यात आलेली आहे, असे सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे यांनी सांगितले. 

गेल्या शुक्रवारपासून गायत्रीनगर, राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्था, परसोडी, आयटी पार्क, व्हीएनआयटी, पीकेव्ही विश्रामगृहानंतर थेट शहराच्या मध्यवर्ती भागातील महाराजबाग परिसरापर्यंतचा प्रवास करणारा बिबट्या अद्यापही वन विभागाला गवसलेला नाही. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्यातील भक्ष्य बदलल्यानंतरही वन विभागाच्या पथकाला हुलकावणी देत लपलेला आहे. तो नाल्या- नाल्यानेच भ्रमंती करीत आहे. बिबट्या गेला कुठे या शोध घेतला जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची चांगलीच दमछाक होत आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com