महामारीच्या काळातही ‘सावकारी’ सुरूच, आरबीआयने करावा हस्तक्षेप... - lenders continue even during epidemic rbi should intervene | Politics Marathi News - Sarkarnama

महामारीच्या काळातही ‘सावकारी’ सुरूच, आरबीआयने करावा हस्तक्षेप...

राजेश चरपे
शनिवार, 1 मे 2021

केंद्र सरकारने अनेक योजनेचे लाभ थेट लोकांच्या जनतेच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी बँकेत खाती सुरू केली. सरकारी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर बँकेत खाते गरजेचे असते. सर्वसाधारणपणे बँकेत पैसे जमा केल्यावर व्याज दिले जाते. पण खात्यावरील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी काही शुल्क आकारले जातात.

नागपूर : कोरोना महामारीच्या या काळात सरकारकडून जनतेला कुठल्या ना कुठल्या स्वरुपात दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातही बॅंका मात्र आपली सावकारी सोडायला तयार नाहीत, हे वास्तव आहे. या काळात तरी अनावश्‍यक शुल्कांची वसुली करू नये, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बॅंकेनेच यावर निर्बंद आणावे, अशी मागणी होत आहे. 

विविध नियमांसह राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका आणि को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे वर्षभरामध्ये अनेक प्रकारचे शुल्क ग्राहकांकडून आकारले जातात. यामध्ये, मंथली ॲव्हरेज बॅलेंस (एमएबी), एसएमएस शुल्क, डेबिट कार्ड शुल्क, इंस्पेक्शन शुल्क आदींचा समावेश आहे. कर्जावरचे व्याज आणि इतर शुल्क वेगळे असतात. आरबीआयने मागील लॉकडाउनच्या काळात कर्जाच्या हप्त्याचा भरणा करण्यासाठी सूट दिली होती. यंदा मात्र सामान्य नागरिक प्रतीक्षेत आहेत. याबाबत, बॅकेंच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता नोकरी अडचणीत येऊ नये, म्हणून त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती केली. 

शासकीय योजनांवर शुल्क आकारणी 
केंद्र सरकारने अनेक योजनेचे लाभ थेट लोकांच्या जनतेच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी बँकेत खाती सुरू केली. सरकारी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर बँकेत खाते गरजेचे असते. सर्वसाधारणपणे बँकेत पैसे जमा केल्यावर व्याज दिले जाते. पण खात्यावरील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी काही शुल्क आकारले जातात. काही बँका एका विशिष्ट रक्कमेपेक्षा अधिक पैसे जमा करण्यावर शुल्क आकारते. ही रक्कम ५० रुपये ते १५० रुपयांपर्यंत आहे. 

हेही वाचा : मृत्यूचे थैमान : कोरोनामुळे दर तासाला देशात 146 तर महाराष्ट्रात 34 जणांचा होतोय मृत्यू

पैसे जमा करण्यासाठीही शुल्क 
१) आयसीआयसीआय बँक- सुरुवातीच्या चार व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारासाठी १४० रुपये शुक्ल घेते. ही बँक एटीएममधून विशिष्ट रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेचा व्यवहार केल्यास २० रुपये आणि त्यावर जीएसटी आकारते. 
२) बँक ऑफ महाराष्ट्र- पहिले तीन व्यवहार मोफत असतात. त्यानंतर जर तुम्ही पैसे जमा करणार असाल किंवा काढणार असाल तर १०० रुपये शुल्क घेतले जाते. 
३) ॲक्सिस बँक- जर १० रुपये, २० रुपये किंवा ५० रुपयांच्या नोटांचे बंडल जमा करायचे असेल तर प्रत्येक बंडलसाठी १०० रुपये द्यावे लागतात. इतकेच नाही तर या बँकेत आधी ईसीएस व्यवहार मोफत होते. त्यावर आता २५ रुपये इतके शुल्क आकारले जाते. 
४) कोटक महिंद्र बँक- ४ व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. त्यानंतर प्रत्येक १ हजार रुपयांवर ३.५ रुपये शुल्क आकारले जाते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख