कुंभकोणी कंटिन्यू झालेले अॅडव्होकेट जनरल नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी नेमलेले...

आता निवडणुका लागल्यामुळे आम्ही त्याला सामोरं जाऊ. मात्र सरकार जे बोलते ते कृतीत दिसत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे, अशी टीका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असलेल्या निवडणूकां संदर्भात केली.
कुंभकोणी कंटिन्यू झालेले अॅडव्होकेट जनरल नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी नेमलेले...
Devendra Fadanvis Warning

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांनी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी Ashutosh Kumbhkoni यांच्यामुळेच आघाडी सरकार प्रत्येक खटला हारत असल्याचा संशय व्यक्त केला होता. यासंदर्भात आज राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of opposition Devendra Fadanvis यांना विचारले असता, हा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनाच Chief Minister विचारला पाहिजे, असा टोला त्यांनी हाणला.

सरकार बदलले की महाअधिवक्ता बदलतात. पण, मागील सरकारमध्ये महाअधिवक्ता असलेले कुंभकोणी याही सरकारमध्ये कायम असल्याची टीका पटोले यांनी केली होती. त्यावर फडणवीस येथील विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी संदर्भातला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. कारण कुंभकोणी यांना मुख्यमंत्र्यांनी नेमले आहे. ते मागील सरकारचे कंटिन्यू झालेले अॅडव्होकेट जनरल नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या अधिकारात नेमले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारला करायची आहे सावकारी वसुली..
सरकारला थकित वीज बिलाची सावकारी वसुली करायची आहे. म्हणून सरकारकडून बाऊ निर्माण केला जात आहे. कोरोनामुळे एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकाराला त्यांच्याकडून जबरदस्ती वसुली करायची असल्याने हे नाटक सुरू असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या प्रेझेन्टेशनमधून त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली हे स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी हाणला.

सरकार जे बोलते, ते कृतीत नाही..
आता निवडणुका लागल्यामुळे आम्ही त्याला सामोरं जाऊ. मात्र सरकार जे बोलते ते कृतीत दिसत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे, अशी टीका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असलेल्या निवडणूकां संदर्भात केली. प्रवीण दरेकर बोलीभाषेत असे बोलले, हे चंद्रकांत दादा पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढणे योग्य नाही. सध्या एनसीपीकडे कुठले मुद्दे नसल्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in