खर्रा, पान खाऊन थुंकणाऱ्यांनो... आता व्हा सावधान ! 

कोरोना थुंकीने पसरत असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे.
Spitting Kharra
Spitting Kharra

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अंमलबजावणी सुरू असलेल्या साथरोग प्रतिबंधात्मक तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. थुंकणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार असून सार्वजनिक सेवेची शिक्षा देण्यात येईल. धूम्रपान करणाऱ्यांसाठीही दंड व शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आता खर्रा खाऊन कुठेही पिचकारी मारणे किंवा सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडणार आहे. 

कोरोना थुंकीने पसरत असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे. थुंकणे व धूम्रपान करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता महानगरपालिकेने उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, दहाही झोनचे सहायक आयुक्त तसेच शहरातील पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे विविध पोलिस अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहे. नागरिकांसोबतच संबंधित दुकानदार, व्यावसायिकांना सुगंधित तंबाखू, खर्रा निर्मिती, विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

थुंकणे, धूम्रपान केल्यास दंड व शिक्षा 
- पहिल्या गुन्ह्यासाठी 1 हजार रुपये दंड, एक दिवस सार्वजनिक सेवा 
- दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपये दंड, तीन दिवस सार्वजनिक सेवा 
- तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये दंड, पाच दिवस सार्वजनिक सेवा 

विक्री करणाऱ्यांसाठी दंड व शिक्षा 
- पहिल्या गुन्ह्यासाठी 1 हजार रुपये दंड व 1 वर्षाची शिक्षा 
- दुसऱ्या गुन्ह्यासाठी 3 हजार रुपये दंड व 2 वर्षांची शिक्षा 

उत्पादकासाठी दंड व शिक्षा 
- पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये दंड व 2 वर्षांची शिक्षा 
- दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये दंड व 5 वर्षांची शिक्षा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com