काटोलचा गड गृहमंत्री अनिल देशमुखांचाच ! - katols fort is belongs to home ministers anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

काटोलचा गड गृहमंत्री अनिल देशमुखांचाच !

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 18 जानेवारी 2021

भोरगड मध्ये ९ पैकी ९ ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये ९ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत.

नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने एकहाती विजय मिळविला. काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. काटोल तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती तर नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतीवर अनिल देशमुख गटाने विजय मिळविला आहे.

काटोल तालुक्यातील भोरगड मध्ये ९ पैकी ९ ही उमेदवार, खंडाळा ग्रामपंचायत मध्ये ७ पैकी ७ ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तर चेनकापूर-माळेगाव मध्ये ९ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी व शेकापचे उमेदवार विजयी झाले आहे. नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने तालुक्यातील सर्वात मोठया असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायतीमध्ये १३ पैकी १० जागांवर, थडीपवनी येथे ९ पैकी ९ जागांवर, महेंद्री येथे ७ पैकी ६, खैरगाव येथे १३ पैकी १०, सिंजर येथे ७ पैकी ५ , अंबाडा येथे ९ पैकी ७, सायवाडा येथे ९ पैकी ६ राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. मदना येथे राष्ट्रवादी व शिवसेना सोबत मिळून लढली होती. येथे एकहाती या आघाडीने सत्ता मिळवित ९ पैकी ९ ही जागेवर विजय प्राप्त केला आहे.

उमठा येथे ७ पैकी ५, दातेवाडी मध्ये ९ पैकी ४, पेठमुक्तापुर ९ पैकी ६, जामगाव खुर्द ९ पैकी ६ , देवग्राम ९ पैकी ८, माणिकवाडा ९ पैकी ६, येरला ७ पैकी ५, देवळी ७ पैकी ५ आणि खरबडी येथे ७ पैकी ४ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. तसेच नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व ९ ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख