काटोल नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १८ नगरसेवक अपात्र

नगर विकास मंत्रालयाने काटोल नगर परिषद बरखास्त करण्याचे व दोषींना अपात्र ठरविण्याच्या सुनावनीतील चार स्वतंत्र प्रकरणाची सुमारे ४५ ते ५० दस्तऐवज सोशल मीडियावर झळकवले. प्रत्येक प्रकरणात १ ते १० व १२ पर्यत दस्तऐवज होते. त्यामध्ये करण्यात आलेली कारवाई, कलम व बरखास्तीचा कालावधी ५ ते ६ वर्ष दिलेला आहे.
Katol Nagar Parishad.
Katol Nagar Parishad.

नागपूर ः काटोल नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सत्तापक्ष नेत्यांसह १८ नगरसेवकांना अपात्र ठरवल्याचे आदेश काल नगरविकास मंत्रालयाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. यामुळे खळबळ उडाली असून राजकीय क्षेत्रात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 

काटोल येथील अर्जदार राधेश्याम बासेवार, राजेश राठी, नगरसेवक संदीप वंजारी यांनी वेगवेगळ्या व काही संयुक्त असे एकूण चार वेगवेगळ्या तक्रारी नगर विकास मंत्रालयाकडे केल्या होत्या. नगर विकास मंत्रालय समोर ११ नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरसद्वारे झालेल्या सुनावणीनंतर वरील अपात्रतेचे आदेश काढण्यात आले आहे. अर्जदार राधेश्याम बासेवार यांच्याशी मोबाईलवर साधलेल्या संपर्कात विचारले असता विद्यमान नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, तत्कालीन उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर व गटनेते चरणसिंग ठाकूर यांनी पदाचा दुरुपयोग केला असल्याचे सांगितले. त्यामुळे नगर विकास मंत्रालयात दाद मागितली.

त्यांच्याविरुद्ध एकूण चार प्रकरणे होती. यात क्रीडांगणाच्या आरक्षित जागेवर घरकुल योजना राबविणे, पंचवटी म्हाडाच्या जागेत पूर्वी बांधलेले बाजार ओटे कुठलीही परवानगी न घेता तोडणे व त्यामुळे नगर परिषदेचा झालेला निधीचा गैरउपयोग, मर्जीतील लोकांना घरकुल देणे, पंतप्रधान आवास योजनेत शासनाच्या निर्णयाविरोधात एकमुस्त रक्कम न देता न. प. फंडातून बिल अदा करणे आदी प्रकरणे असल्याची माहिती मिळाली. याबाबत गटनेत्यांचे मत जाणून घेतले असता. सत्यमेव जयते, मी समाजाकरिता चांगले काम केले असून माझी ही यात्रा थांबणार नाही, मी कुणालाही दोष देत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.  

चार आदेशाचे सुमारे ४५ पाने 
नगर विकास मंत्रालयाने काटोल नगर परिषद बरखास्त करण्याचे व दोषींना अपात्र ठरविण्याच्या सुनावनीतील चार स्वतंत्र प्रकरणाची सुमारे ४५ ते ५० दस्तऐवज सोशल मीडियावर झळकवले. प्रत्येक प्रकरणात १ ते १० व १२ पर्यत दस्तऐवज होते. त्यामध्ये करण्यात आलेली कारवाई, कलम व बरखास्तीचा कालावधी ५ ते ६ वर्ष दिलेला आहे.

नगरसेवक आणि सत्तापक्ष नेते  चरणसिंह ठाकूर,  नगरसेवक  मीरा उमप, श्वेता डोंगरे,  किशोर  गाढवे,  शालिनी बनसोड,  माया शेरेकर, राजू  चरडे,  लता कडू, सुभाष कोठे, संगीता हरजाल, सुकुमार घोडे,  वनिता रेवतकर, देविदास  कठाणे, शालिनी ताई महाजन, प्रसन्ना श्रीपदवार, जयश्री भूरसे, मनोज  पेंदाम, हेमराज रेवतकर, तानाजी थोटे यांना नगर परिषद 1965 च्या कलम 42 अनुसार नगरसेवक पदावरून हटविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय कोणतीही निवडणूक लढवण्यावर बंदी घातली गेली आहे. नगरसेवक संदीप नानाजी वंजारी यांनी या  प्रकरणात तक्रार दाखल केली होती. याशिवाय  राधेशाम  बसेवार आणि राजेश राठी यांच्या तक्रारीवरून चरणसिंह  ठाकूर यांना 55(बी) नुसार सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com