‘तो’ माझा कोरोनाबाबचा पहिला बाइट, कुणीतरी खोडसाळपणा केला !

मास्क वापरणं बंधनकारक नाही, असं मी तेव्हाच्या परिस्थितीत बोललो होतो. कुणीतरी खोडसाळपणा करून मी आता ते वक्तव्य केले, असे त्या व्हिडिओतून भासवण्याचा प्रयत्न करतोय. असे करून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : सध्या सोशल मिडीयावर माझा एक व्हिडिओ फिरतोय. त्यामध्ये ‘वारंवार हात स्वच्छ धुवा, मास्क वापरण्याची गरज नाही़’, असे मी सांगितले होते. यामधील ‘मास्क वापरण्याची गरज नाही़’, हे एडीट करून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील कोरोनासंबंधीत घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतील ‘तो’ बाइट आहे. कुणीतरी खोडसाळपणा करून आजच्या स्थितीत तो बाइट व्हायरल करीत असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सांगितले. 

त्या पत्रकार परिषदेमध्ये मला मास्कच्या बाबतीत प्रश्‍न विचारला होता की, मास्क वापरणे बंधनकारक आहे का? त्यावेळेसच्या सरकारच्या मार्गदर्शक सूचना अशा होत्या की, जे डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतात त्यांना आणि रुग्णांना मास्क बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त इतर कुणीही मास्क वापरण्याची गरज नाही, असे स्पष्ट निर्देश तेव्हा देण्यात आले होते. त्यानुसारच मी ते वक्तव्य केले होते. त्यानंतर आयसीएमआर आणि शासनाने या मार्गदर्शक सूचना बदलविल्या आणि सांगितले की प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये ही गोष्ट मी स्पष्टपणे सांगितली होती, असे आयुक्त मुंढे म्हणाले. 

आयुक्त म्हणाले, मास्क वापरणं बंधनकारक नाही, असं मी तेव्हाच्या परिस्थितीत बोललो होतो. कुणीतरी खोडसाळपणा करून मी आता ते वक्तव्य केले, असे त्या व्हिडिओतून भासवण्याचा प्रयत्न करतोय. असे करून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. हा लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. एप्रिल महिन्यापासून घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्कमुळे विषाणूचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो, संसर्ग कमी करू शकतो. त्यामुळे मी आज पुन्हा सर्वांना विनंती करतो, की अति महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि घराबाहेर निघताना मास्कचा वापर करा. घरात एकापेक्षा जास्त लोक असतील, तर घरात सुद्धा मास्कचा वापर करावा, अशी सूचनादेखील त्यांनी केली.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com