सत्तेच्या जवळ पोचलो असा "त्यांचा' गैरसमज होतोय : डॉ. नितीन राऊत 

सत्तेची लालसा यांच्या मनातून अजूनही जात नाहीये. यांच्या मनात कितीही लालसा दाटली तरी ती पूर्ण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. आमची सरकार हे लोक पाडू शकत नाहीत,
Nitin Raut
Nitin Raut

नागपूर : मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये कोरोनाची दहशत दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून 10 दिवसांसाठी लष्कराच्या ताब्यात देण्यात येणार आहेत, असे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. हे भाजपच्याच लोकांचे कारस्थान आहे. अशी कारस्थाने करुन आपण सत्तेच्या जवळपास पोचलो, असा त्यांचा गैरसमज झाला आहे. पण आमची सरकार हे लोक पाडू शकत नाही, असे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले. 

डॉ. राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे लोकच असे संदेश समाजमाध्यामांवर पसरवत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढताहेत हाच जर मुंबई आणि पुणे लष्कराच्या ताब्यात देण्याचा निकष असेल, तर सर्वात पहीले अहमदाबाद लष्कराच्या ताब्यात दिले पाहीजे. कारण तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातल्या या दोन शहरांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. काहीतरी राजकीय खेळी करुन सरकारला बदनाम करणे आणि सरकार पाडण्याचाच हा विरोधी पक्षाचा डाव दिसतोय. आज ज्या प्रकारचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होतोय, कुणी याला अफवा म्हणतात. पण याला अफवा निश्‍चितच म्हणता येणार नाही. कारण भाजपच्या लोकांनी महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी हेतुपुरस्सरपणे हे कारस्थान रचले आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांना भेटून सांगितले की, सरकार व्यवस्थित काम करत नाहीये आणि आजची पत्रकार परीषद त्यांनी ज्या पद्धतीने घेतली. यावरुन असे निदर्शनास येते की, यांना वाटतेय, आपण सत्तेच्या जवळ आलो. सत्तेची लालसा यांच्या मनातून अजूनही जात नाहीये. यांच्या मनात कितीही लालसा दाटली तरी ती पूर्ण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. आमची सरकार हे लोक पाडू शकत नाहीत, असे डॉ. राऊत म्हणाले. 

"मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून संपूर्ण लॉकडाऊन होणार आहेत आणि लष्कराच्या ताब्यात दिली जाणार आहेत. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नियंत्रण या दोन शहरांवरुन जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या गरजेच्या वस्तुंचा साठा करुन ठेवावा. या 10 दिवसांच्या लॉकडाऊन काळात केवळ दुध आणि औषधी मिळू शकतील. त्यामुळे आपण मुंबई आणि पुणे येथे राहणाऱ्या आपआपल्या मित्र, नातेवाईकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा', असा संदेश आज सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यासंदर्भात आज "सरकारनामा'ने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी संपर्क केला. त्यावर त्यांनी उपरोक्त प्रतिक्रीया दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com